Konkan Hapus: इतर राज्यातील आंबा ‘कोकण हापूस' म्हणून विकल्यास कारवाई होणार, पणन संचालकांचे आदेश

इतर राज्यातून आलेल्या आंब्याची देवगड हापूस, कोकण हापूस या नावाने विक्री केल्याचा प्रकार सातत्याने उघडकीस आला आहे.
Konkan Hapus: इतर राज्यातील आंबा ‘कोकण हापूस' म्हणून विकल्यास कारवाई होणार, पणन संचालकांचे आदेश
Published On

पुणे: सध्या आंब्याचा हंगाम सुरु झालाय. अनेक ठिकाणी इतर राज्यातून आलेल्या आंब्याची देवगड हापूस, कोकण हापूस या नावाने विक्री केल्याचा प्रकार सातत्याने उघडकीस आला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी सर्व बाजार समित्यांना आणि संबंधित नोंदणीकृत संस्थांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर आंब्याची हापूसच्या नावाने विक्री कराल, तर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे (Action will be taken if other states mango are sold as Konkan Hapus order from the Director of Marketing).

Konkan Hapus: इतर राज्यातील आंबा ‘कोकण हापूस' म्हणून विकल्यास कारवाई होणार, पणन संचालकांचे आदेश
Alphonso | स्वस्त मिळाला नाही म्हणून हापूसच्या नावाखाली केरळी आंबा खाऊ नका !;पाहा Special Report !

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोकणचा (Konkan) राजा अर्थात हापूस आंब्याची (Alphonso Mango) देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय केरळ, गुजरात, कर्नाटक यासह इतर राज्यातून आंबा येतो. कोकणातील हापूस आंबा (Hapus Mango) रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात.

आंब्यांची अदलाबदल करुन विक्री करतात. हंगामाच्या सुरवातीला पुणे बाजार समितीत केरळ येथून आलेला आंबा हा ‘देवगड हापूस' या नावाने लेबल लाऊन विक्री करतानाचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्याच्या पणन संचालकांनी याबाबत तपासणी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.

राज्यातील बाजार समित्यांच्या फळ बाजार आवारात आवक होत असलेला आंबा हा ज्या राज्यातून आला आहे. त्या राज्यातील मुळ जातीच्या नावानेच विक्री होईल याबाबतची दक्षता घ्यावी. बाजार समित्यांना बाजार आवारातील सर्व गाळेधारक अडत्या, व्यापारी, हुंडेकरी यांना याबाबतच्या सक्त सुचना देण्यात याव्यात. तसेच, अशाप्रकारे परराज्यातून आवक झालेला आंबा हा त्या राज्याच्या आणि आंब्याच्या जातीच्या नावाने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास, तसेच याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे पणन संचालकांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता ग्राहकांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. याबाबत सकाळने सातत्याने पाठपुरावा केला होता.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com