एकनाथ शिंदे यांच्या शिवनसेनेकडून अखेर राज्यसभा उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 उमेदवार जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या 6 उमेदवारांची निवड निश्चित आहे. तसेच महाविकासआघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शिंदेंनी धक्कातंत्राचा वापर करत महिला उमेदवाराला संधी दिली आहे. ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारी देण्यात आली आहे.
सर्वच पक्षांनी आपले उमेदवार हे जाहीर केले होते. महाविकास आघाडीकडून शरद पवार हे उमेदवार आहे. तर भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते, रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कोण राज्यसभेवर जाणार याचा शेवटपर्यंत सस्पेन्स होता. राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, संजय निरुपम आणि हेमंत गोडसे आणि महिला उमेदवारांमधून शायना एन सी यांचे नाव चर्चेत असताना ज्योती वाघमारे यांचे नाव अनपेक्षितरित्या समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
सोलापूरमधील आंबेडकरी चळवलीतला आक्रमक चेहरा असून त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अत्यंत गरिबीची आहे. वाघमारे यांची तेलगू आणि इंग्रजीमध्ये पीएचडी झाली असून मराठी भाषेवर देखील प्रभुत्व आहे. मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीत त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघामरे हे दलित पंथरचे कार्यकर्ते होते आणि माजी नगरसेवक देखील राहून गेले आहे.
ज्योती वाघमारे या 2014 ला महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष देखील होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून ब्रेक ही घेतला होता. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत प्रवक्ते पद सांभाळत होते. आता त्यांना राज्यसभा उमेदवारी देण्यात आल्याने दिल्लीत शिंदेसेनेचा आवाज पुन्हा एकदा जोरदार गरजणार असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.