Photography : फोटोग्राफी प्रेमींनी भारतातील 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या, निसर्गाचे अद्भुत सौंदर्य अनुभवा..

Photography Places In India : प्रत्येक सुंदर क्षण किंवा दृश्य टिपायला कोणाला नाही आवडत. जर तुम्हीसुद्धा फोटोग्राफी चे चाहते असाल तर भारतातील 'या' अद्भूत सौंदर्याने नटलेल्या ठिकाणांना नक्की भेट द्या.
Photography Places In India
PhotographySAAM TV

अनेक लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊन तिथेल सौंदर्य टिपायची आवड असते. असे लोक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी जगभरात फिरतात. आपल्या कॅमेरात ते दृश्य कॅपचर करून तो क्षण आयुष्यभरासाठी फोटोत जपून ठेवतात. अशाचा फोटोग्राफी प्रेमींसाठी भारतातील निसर्गरम्य ठिकाणे जाणून घेऊयात..

तामिळनाडू

तामिळनाडूमधील कोडाईकनाल हे थंड हवेचे ठिकाण पावसात फिरण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी अप्रतिम आहे. कोडाईकनाल पश्चिम घाटात वसले आहे. समृद्ध निसर्गाचे दर्शन येथे करता येते.

राजस्थान

राजस्थानची संस्कृती आणि राजेशाहीची उत्तम झलक कॅमेरात टिपण्यासाठी फोटोग्राफर येथे मोठ्या संख्येने येतात. राजस्थान हे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. मोठे राजवाडे हे राजस्थानचे आकर्षण आहे.

लडाख

पावसाळा हा लडाखचे सौंदर्य टिपण्यासाठी उत्तम काळ आहे. ओले रस्ते, चहूबाजूंनी हिरवळ, थंड हवा आणि आकाशात धुके असा डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग येथे जवळून पाहायला मिळतो.

मेघालय

मेघालयचे नयनरम्य सौंदर्य टिपण्यासाठी जगभरातून फोटोग्राफर या ठिकाणाला भेट देतात. पावसात निसर्गाचे अद्भुत रूप येथे पाहायला मिळते. उंचावरून वाहणारे धबधबे हे मेघालयचे आकर्षण आहे.

Photography Places In India
Traveling With Children : लहान बाळाला घेऊन बिनधास्त करा फिरण्याचा प्लान, कशी घ्याल काळजी?

आग्रा

कोणत्याही ऋतूमध्ये आग्राचे सौंदर्य बहरत राहते आणि हे सौंदर्य आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी प्रत्येकजण फोटोग्राफी करतो. जगभरातील फोटोग्राफर ताजमहालचे सौंदर्य आपल्या नजरेतून टिपण्यासाठी येथे येतात.

जम्मू -काश्मीर

जम्मू -काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. जम्मू -काश्मीर ही भारताला मिळालेली निसर्गाच्या सौंदर्याची देण आहे. येथे फोटोशूटसाठी सर्वोत्तम ठिकाणे आहेत. बर्फवृष्टीनी सजलेली ठिकाणे फोटोमध्ये कैद करायला पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. दाट हिरवीगार झाडी, निरभ्र आकाश पाहण्याचा सुरेख अनुभव येथे मिळतो.

केरळ

केरळचे सौंदर्य त्यांच्या शांतीत आहे. येथील प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते . हीच निसर्गाची शांती चित्रात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. नारळाची उंच झाडे, समुद्रकिनारे हे केरळचे आकर्षण आहे.

Photography Places In India
Job Opportunity: इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी; खलाशी आणि यांत्रिक पदासाठी भरती; जाणून घ्या कोण करू शकतो अर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com