लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना फिरायला आवडते. सुट्टी मिळताच आपली पाऊले बाहेर पळू लागतात. पण पालक झाल्यावर हीच पाऊले आपोआप मागे फिरतात. आपण खूप ठिकाणी असे पाहतो की, बाळामुळे पालकांना बाहेर फिरण्याचा प्लॉन करायला अडथळे येतात. इतक्या लहान बाळाला घेऊन प्रवास कसा करायचा? हा प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनात येतो. पण असे किती दिवस प्लॉन रद्द करणार किंवा बाळाला नातेवाईकांकडे सोडून जाणार. त्यापेक्षा बाळाची थोडी विशेष काळजी घेतल्यास तुम्ही बाळाला आपल्यासोबत फिरायला घेऊन जाऊ शकता. बाळासोबत तुमचा प्रवासही सुखकर होईल.
चला तर मग जाणून घेऊयात प्रवासात लहान बाळांची काळजी कशी घ्यावी..
प्रवासादम्यान स्वच्छता बाळगावी
आपल्यासोबत फिरायला जाताना बाळ असल्यास आपल्याला स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण ते बाळ सर्वत्र फिरत राहते. बाळाच्या हातापायाच्या वाटे तोंडात घाण जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मुलांना प्रवासादरम्यान दोन वेळा पुसा आणि त्यांचे कपडे देखील बदला. मुलांच्या डायपरकडे विशेष लक्ष द्या. ते ओले झाल्यास मुलांची जास्त चिडचिड होऊ शकते. प्रवासात मुलांना बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे बाजारात सहज उपलब्ध असलेले लहान मुलांचे डासांपासून संरक्षण करणारे क्रीम तुमच्या सोबत ठेवा. उदा.ओडोमॉस
बाळाची औषधे
बाहेरील हवामानामुळे बाळाला थोडा त्रास झाल्यास त्याचावर प्रथमोपचार करता येईल अशी औषधे कायम सोबत ठेवा. तसेच बाहेर जाण्यापूर्वी आपल्या बाळाची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. जेणेकरून प्रवासात कोणता त्रास होणार नाही.
बाळाचे खाणे
प्रवासामध्ये तुमच्या मुलांना लागणारे सर्व खाद्यपदार्थ हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवा. उदा. बेबी फूड, मिल्क पावडर तसेच प्रवासात छोटे ज्यूसरही सोबत ठेवा. यामुळे तुम्ही मुलांना फळाचे रस देऊ शकता. प्रवासादरम्यान द्रव पदार्थ सोबत ठेवत असाल तर या पदार्थांची विशेष काळजी घ्यावी.
बेबी स्ट्रॉलर
प्रवासाला जाताना फोल्ड करता येईल असा हलका बेबी स्ट्रॉलर स्वतःसोबत ठेवा. त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने चालू शकता आणि बाळाला देखील आराम मिळेल. तसेच गाडीमध्ये बाळाला शांत झोप लागेल अशी छोटी गादी देखील सोबत ठेवावी.
बाळाचे स्किन केअर
बाहेर फिरायला जाताना वातावरण कसे असेल याचा अंदाज तुम्हाला नसतो. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून फिरायला जाताना बाळाचे स्कीन केअर प्रोडक्ट नेहमी सोबत ठेवा. उदा. बॉडीलोशन, मॉइश्चरायझर, वेट वाइप्स .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.