Girls Solo Trip : कुछ तुफानी करेंगे..! महिलांनो सोलो ट्रिपसाठी व्हा तयार, भारतातील 'ही' ठिकाणे आहेत सुरक्षित आणि भन्नाट...

Girls Solo Trip Place In India : मुलींना फिरणे आणि शॉपिंग करणे प्रचंड आवडते. काही मुली मात्र दुसऱ्यांपेक्षा स्वतःची कंपनी खूप एन्जॉय करतात. अशाच सोलो ट्रिप प्रेमी महिलांसाठी सुरक्षित सोलो ट्रिपची ठिकाणे जाणून घेऊयात...
Girls Solo Trip Place In India
Girls Solo TripSAAM TV

Girls Solo Trip : संपूर्ण जग फिरण्याची इच्छा प्रत्येकाला असते. काही लोक आपल्या कुटुंब- मित्रपरिवारासोबत फिरण्याचा आनंद घेतात तर काही लोकांना एकट्याने फिरायला खूप आवडते. खरतर सोलो ट्रिपची मज्जाच काही तरी वेगळी असते. पण हीच सोलो ट्रिप एखादी महिला करत असेल तर तिच्या सुरक्षितेची विशेष काळजी तिला आणि तिच्या घरच्यांना भेडसावते. त्यामुळे अशा मुलींचे अनेक सोलो ट्रिप प्लान अनेकदा रद्द होतात.

Girls Solo Trip Place In India
Pregnancy Travel Tips: गरोदरपणात प्रवास करताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

महिलेची सोलो ट्रिप म्हणजे तिच्या मानसिक आरोग्याला दिलेला मोठा आनंद होय. या एका ट्रिपमुळे ती पुढील बऱ्याच काळासाठी चार्ज होते. सोलो ट्रिपमुळे तिला स्वतःसाठी वेळ मिळतो. तिला हव्या असलेल्या गोष्टी ती करू शकते. काही दिवस का होईना फक्त ती स्वतःसाठी जगू शकते. या प्रवासात ती स्वतःला नव्याने गवसते आणि पुन्हा नव्या उमेदीने आकाशात भरारी घ्यायला तयार होते. तर मग महिलांनो पुन्हा एकदा चार्ज होण्यासाठी सुट्टीमध्ये करा भारतातील 'या' ५ ठिकाणी तुमच्या सोलो ट्रिपचा प्लान...

आग्रा

ताजमहलच्या सौंदर्याची भुरळ प्रत्येक माणसाला असते. विशेषता महिला वर्गाला थोडी जास्तच. जर तुम्ही सोलो ट्रिप प्लान करत असाल तर ताजमहलचे सौंदर्य टिपायला आवर्जून जा. तसेच आग्र्यामधील इतर अनेक ऐतिहासिक स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

चेन्नई

तामिळनाडूची राजधानी चेन्नईही निसर्गरम्य ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील मंदिरे पर्यटनाचे आकर्षण आहे.

चंबा

हिमालय प्रदेशातील चंबा हे शहर एकटे फिरण्यासाठी महिलांना सुरक्षित आहे. येथे मंदिरासोबतच इतर निसर्गरम्य ठिकाणे फिरण्यासाठी सुंदर आहेत.

वाराणसी

वाराणसी हे एक पवित्र आणि धार्मिक शहर आहे. भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी लोक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. वाराणसीमधील वेगवेगळे घाट हे तेथील पर्यटनाचे आकर्षण आहे.

म्हैसूर

महिलांनी एकटे ट्रॅव्हल करण्यासाठी म्हैसूर हे उत्तम ठिकाण आहे. ऐतिहासिक वास्तू, मोठे राजवाडे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते. म्हैसूरमध्ये दसरा सणासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.

Girls Solo Trip Place In India
Monsoon Travel Places in Maharashtra: पावसाळ्यात करा, महाराष्ट्रातील 'या' ५ थंडगार ठिकाणांची सफर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com