ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जाणूनबुजून किंवा नकळत लोक काही सवयी लावून घेतात. ज्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या सवयींमुळे भविष्यात मानसिक आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न यांचे नियमित सेवन केल्याने मेंदू सक्रीय राहत नाही.
व्यायामाअभावी मेंदू कमजोर होत असतो. मेंदू सक्रीय राहण्यासाठी ताजेतवाने राहण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे.
आपल्यातील बरेच जण सोशल मीडियाचा वापरत करतात. तेथील अभासी जगाशी आपल्या जीवनाची तुलना करतात. त्यामुळे मनात नकारात्मक भावना निर्माण होत असते.
नकारात्मक विचारांमुळे मानसिक आजार होण्याचा धोका वाढत असतो.
एकटेपणामुळे आपल्या मनात नैराश्य आणि तणाव निर्माण होत असते.
तणावपूर्ण परिस्थिती आणि जास्त कामाचा ताण हे आपल्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या