ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाची झळ शोषून घेतल्यावर सर्वजण आतूरतेने वाट पाहत असतात ते थंड ओल्याचिंब करून टाकणाऱ्या पावसाची.
महाराष्ट्रात आता पावसाला हळूहळू सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे.
या थंडगार मोसमात तुम्हीसुद्धा बाहेर जायचा प्लॅन करत आहात, तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील थंडगार पर्यटन स्थळे.
इगतपुरी हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे येथे वर्षभर थंड वातावरण असते. निसर्गाच्या हिरवळीचा जवळून अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
साताऱ्या जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरागांमधील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माळशेज घाट. हिरव्या दऱ्या, धबधब्यांचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी तुम्ही माळशेज घाटाची सफर नक्कीच करू शकता.
कळसुबाई शिखर हे पावसाळ्यातील ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे सह्याद्रीच्या लांबचलांब पर्वतरांगा पाहण्याचा अनुभव आपल्याला मिळतो.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विविध वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.