Historical Places : सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लान करताय; मग छत्रपती संभाजीनगरमधील 'या' ऐतिहासिक ठिकाणी नक्की भेट द्या

Aurangabad : देवगिरी किल्ला दौलताबाद येथील आहे. हे एक ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. देवगिरी किल्ला यादवांची राजधानी आहे. शालेय मुलांसह तुम्ही येथे भेट देऊ शकता.
Aurangabad
Historical PlacesSaam TV
Published On

सुट्टी मिळताच आपले फिरण्याचे प्लान सुरु होतात. 'कुठे जाऊ कुठे नाही' अशी आपली अवस्था होते. तर तुम्ही सुद्धा सुट्टीमध्ये बाहेर जाण्याच्या तयारीत असाल तर, या वेळी 'छत्रपती संभाजी नगर'ला भेट देऊन ऐतिहासीक गोष्टींची माहिती घेता येईल. अनेक व्यक्ती बाहेर विविध देशांमध्ये फिरत असतात. मात्र जग फिरण्याआधी आपल्या महाराष्ट्राचे सौंदर्य अनुभवणे गरजेचे आहे.

Aurangabad
Tourist Places In Sangali: सांगलीची निसर्गरम्य सफर; 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

पर्यटनासाठी छत्रपती संभाजीनगर हे एक उत्तम ठिकाण आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. जगभरातून अनेक लोक येथे पर्यटनासाठी येतात. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देता येईल आणि आपल्या इतिहासाची एक उजळणी देखील होईल. लहान मुलांसाठी हे फिरण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. ज्ञान आणि फिरण्याचा आनंद या दोन्ही गोष्टी मुलांना येथे एकत्र घेता येतील.

छत्रपती संभाजीनगरला गेल्यावर या ऐतिहासिक स्थळांना आवर्जून भेट द्या...

देवगिरी किल्ला

१२ व्या शतकातील हा देवगिरी किल्ला दौलताबाद येथील आहे. हे एक ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. देवगिरी किल्ला यादवांची राजधानी म्हणून ओळखला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात अनेक ऐतिहासिक गोष्टी ठेवल्या आहेत. या गोष्टी पाहण्यासाठी पर्यटक या संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. या संग्रहालयात शिवकालीन शस्त्रे आणि इतर वस्तू पाहायला मिळतात.

पान चक्की

पान चक्की प्राचीन भारताचे एक वैशिष्ट्य आहे. ही एक पाण्यावर चालणारी गिरणी आहे. सुफी संतांच्या काळात या गिरणीमधून भाकरीसाठी पीठ दळले जात होते.

पितळखोरा लेणी

खडकांमध्ये कोरलेली पितळखोरा लेणी पर्यटनाचे आकर्षण आहे. यातील कोरीव काम पितळखोरा लेणीचे वैशिष्ट्य आहे. वाहणारे धबधबे या लेणीचे सौंदर्य वाढवतात. या लेणीमध्ये प्राण्यांचे शिलालेख, सैनिकांचे पुतळे आहेत. रॉक-कट आर्किटेक्चरचा हा एक उत्तम नमुना आहे.

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठे धरण आहे. हे धरण गोदावरी नदीवर बांधले गेले आहे. या धरणाला एकूण २७ दरवाजे आहेत.

मैसमाळ

निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. हिरवीगार झाडी, थंड हवा, स्वच्छ परिसर यासाठी मैसमाळ प्रसिद्ध आहे. फोटोशूटचे हे एक उत्तम ठिकाण आहे.

Aurangabad
Marathi Historical Serial: राजा शिवछत्रपतीसह 'या' मालिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com