ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराची एक ऐतिहासिक शहर म्हणून जगभर ओळख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी कल्याण शहराचा जवळचा संबंध आहे. या शहरात आजही तुम्हाला अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात.
चला तर पाहूयात कल्याण असलेले काही पर्यटन स्थळे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण शहरात दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली होती. हा किल्ला एका खाडी किनारी उभारलेला आहे.
भगवा तलावास शेणाळे तलाव म्हणूनही ओळखले जाते. लहान मुलांपासून प्रत्येकासाठी हे ठिकाण आवडीचे आहे.
कल्याण शहरापासून काही अंतरावर बिर्ला मंदिर स्थित आहे. अनेक भाविक या मंदिराला भेट देत असतात.
कल्याण शहरात असलेला गणेश घाट प्रत्येक पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे. दरोरज असंख्य नागरिक येथे येत असतात.
कल्याण शहरापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर लोनाड लेणी आहे. या लेणीमध्ये अक शिवमंदिरही आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात.