Marathi Historical Serial: राजा शिवछत्रपतीसह 'या' मालिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने...

Marathi Television Serial: प्रेक्षकांच्या भेटीला आतापर्यंत अनेक ऐतिहासिक मालिका आल्या आहेत. त्यातील काही टीआरपीच्या अभावामुळे बंद झाल्या आहेत.
Marathi Television Historical Serial
Marathi Television Historical SerialSaam Tv
Published On

Marathi Television Historical Serial: टेलिव्हिजन विश्वात नेहमीच वेगवेगळ्या आशयाचे आणि वेगवेगळ्या धाटणीचे विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला काही ऐतिहासिक मालिका आल्या होत्या. प्रेक्षकांच्या समोर इतिहासात घडलेल्या विशेष घटना त्या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या होत्या. अनेक मालिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद ही दिला होता. तर काही मालिका टीआरपीच्या अभावामुळे बंद देखील झाल्या. चला तर जाणून घेऊया ऐतिहासिक मालिकांबद्दल...

Marathi Television Historical Serial
Rochelle-Keith Baby Bump Photos: लग्नानंतर ५ वर्षांनी फेमस सेलिब्रिटी कपलनं दिली गोड बातमी; समुद्रकिनाऱ्यावरचं फोटोशूट चर्चेत

राजा शिवछत्रपती (Raja Shivchhatrapati)

राजा शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका स्टार प्रवाह या चॅनलवर प्रसारित होत होती. दृश्यांमध्ये असलेली रिॲलिटी, कथानकातील भारदस्तपणा प्रेक्षकांची मने जिंकत होता. ही मालिका २००८- ०९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.

उंच माझा झोका (Unch Majha Zoka)

रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘उंच माझा झोका’ ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित झाली होती. या मालिकेच्या टायटल साँगने प्रेक्षकांचे मन जिंकले.

Marathi Television Historical Serial
Shraddha Kapoor Video: श्रद्धा कपूर झाली गोरीमोरी; एवढं लाजायला विमानतळावर नेमकं काय घडलं? VIDEO

स्वामिनी (Swamini)

रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘स्वामिनी’ ही मालिका २०१९-२०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेतील सर्वच कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी कामाची पोचपावती दिली होती.

स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji)

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत संभाजी महाराजांचे पात्र डॉ. अमोल कोल्हेंनी साकारले होते. ही मालिका झी मराठीवर प्रकाशित झाली होती.

Marathi Television Historical Serial
Kiran Mane In Sindhutai Mazi Mai: ‘पण तिनं हार मानली नाही...’ किरण मानेने सिंधूताईचा प्रवास सांगत केली महत्वाची घोषणा

लोकमान्य (Lokmanya)

बाळ गंगाधर टिळकांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘लोकमान्य’ या मालिकेत लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत क्षितिज दातेने पात्र साकारले होते. ही मालिका झी मराठीवर या वाहिनीवर टेलिकास्ट होत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com