ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्री गणपती मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. सांगलीचा प्रवास या मंदिराच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे.
हरिपूर कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. येथे संगमेश्वर नावाचे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.
औदुंबर हे कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्री दत्तात्रयांचे देवस्थान आहे. या देवळावरील गोपुर म्हणजे जुन्या शिल्पकलेचा उत्तम नमुना होय.
सांगली येथील हे खूप प्राचीन देवस्थान आहे. निसर्ग सौंदर्य आणि गर्द झाडी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे.
रामलिंग बेट हे सांगलीतील पर्यटनाचे मोठे आकषर्ण आहे. हे बेट बोरगाव येथील कृष्णा नदीच्या पात्रात वसले आहे.
सागरेश्वर अभयारण्य हे विविध जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सागरेश्वराचे हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे.
सांगली येथील रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्धांचे स्वयंभू स्थान आहे.
वारणा नदीवर बांधण्यात आलेल्या धरण परिसराला लागूनच चांदोली अभयारण्य आहे. येथे अनेक वन्यप्राणी पाहायला मिळतात.