Satara Travel: स्वर्गाहून सुंदर सातारा! निसर्ग, हिरवी झाडी अन् धबधबे पाहण्यासाठी 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Mansoon Satara Travel: पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अजूनच वाढते. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. तुम्ही साताऱ्यातील काही सुंदर ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.
Satara Travel
Satara TravelSaam Tv

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात हिरवी झाडी आणि निसर्गरम्य वातावरण होते. पावसाळ्यात अनेकजण फिरण्यासाठी जातात. जर तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर या ठिकाणांनी नक्की भेट द्या.

सातारा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा, सुंदर निसर्ग लाभलेला आहे. पावसाळ्यात साताऱ्याचं सौंदर्य अजूनच बहरतं. त्यामुळे तुम्ही साताऱ्यातील काही ठिकाणांना नक्की भेट देऊ शकतात. पावसाळ्यात साताऱ्यात अनेक डोंगरावर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. त्याचसोबत डोंगर हिरवगर्द झाडीने नटलेले दिसतात. तसेच पांढरेशुभ्र धबधबे कोसळताना दिसतात. या अद्भूत सौंदर्यांला पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणांना भेट द्या.

तापोळा

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळाला मिनी काश्मिर म्हटले जाते. तापोळा गाव कोयना धरणाऱ्याच्या जलाशयाच्या टोकावर वसलेले आहे. येथे तुम्ही डोंगरावरील हिरव गर्द झाडी पाहू शकतात. या डोंगरावर धुक्याची चादर पाहायला मिळते.

हुंबरळी

कोयना नगरपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेले हुंबरळी गाव. येथून तुम्हाला कोयना धरणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. येथे तुम्ही खासगी रिसॉर्ट बुक करुन तिथे राहू शकतात.

Satara Travel
Evening Workout: कोणत्या वेळी व्यायाम करणं ठरतं फायद्याचं ? सकाळी की संध्याकाळी...

ठोसेघर धबधबा

पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी होते. साताऱ्यापासून जवळच असलेला ठोसेघर धबधबा हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. ठोसेघर धबधबा हा जवळपास १५० ते १८० मीटर उंचीवरुन कोसळतो. येथे तुम्ही नक्की भेट द्या.

कास पठार

सातारा शहराच्या २२ किलोमीटर अंतरावर कास पठार आहे. या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वेगवेगळ्या रंगाची फुले उमलतात. मान्सूमध्ये येथील सौंदर्य हे डोळ्यांचे पारणे फेडून टाकते.

Satara Travel
Vegetable Rate: अरे बापरे! कांदा ५० तर भेंडी ७० रूपये किलो; पावसाळ्याच्या तोंडावरच भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com