पावसात फिरण्याचा आनंद घेणे म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही सुद्धा या पावसात मस्त खूप दिवसांसाठी बाहेर जायचा प्लान करत आहात, तर हा लेख संपूर्ण वाचा. पावसात आपण अनेक वेळा गोवा, अलिबाग, माथेरान, लोणावळा अशा अनेक ठिकाणांना भेट देतो. पण या थंडगार पावसात गुलाबी शहराला भेट द्या आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा आस्वाद घ्या. राजस्थानची राजधानी जयपूर हे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक जयपूरचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात. जयपूर गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ही पिंक सिटी राजस्थानची राजधानी आहे. पावसात पर्यटक मोठ्या संख्येने जयपूरचे सौंदर्य पाहायला गर्दी करतात. येथील ऐतिहासिक आणि जलमय ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.
चला तर मग जाणून घेऊयात या गुलाबी शहराजवळील निसर्गरम्य ठिकाणे....
आमेर किल्ला
या किल्ल्यावरून गुलाबी जयपूरचे सुंदर सौंदर्य अजूनच सुरेख दिसते. हा किल्ला अरवली डोंगराच्या माथ्यावर आहे. फोटोशूटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
चांदलाई तलाव
स्थलांतरित पक्षांसाठी चांदलाई तलाव प्रसिद्ध आहे. हे तलाव कोटा-जयपूर महामार्गावरील टोक रोडवर आहे. जयपूरला आल्यावर या तलावाला नक्की भेट द्या आणि येथील निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घ्या.
कानोता धरण
कानोता धरण हे पावसातील हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. हे धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात.
हवा महल
हवा महल जयपूरची शान आहे. हा पॅलेस त्याच्या बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावरून जयपूरचे सौंदर्य पाहण्याचा अनुभवच वेगळा आहे.
जलमहाल
जलमहाल हा पाण्याच्या मधोमध आहे. हे एक शांत ठिकाण आहे. पावसात येथे फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
आमेर सागर
आमेर सागर हे १७ व्या शतकातील एक नयनरम्य सरोवर आहे. आमेर किल्ल्या जवळील खीर गेट येथे हे सरोवर आहे. या ठिकाणाला पावसात भेट देणे उत्तम राहील.
गलता मंदिर
गलता मंदिर हे दिल्ली- आग्रा महामार्गावर आहे. नैसर्गिक झऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठी प्रमाणात गर्दी करतात. गलता मंदिर हे पर्वतांनी वेढलेले आहे.
चोखी ढाणी
राजस्थानची संस्कृती आणि चवदार खाद्यपदार्थांचा अनुभव घ्यायचा असेल तर जयपुरमधील चोखी ढाणी या रिसॉर्टला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला जयपूरी हस्तकला, शिल्पकला पाहायला मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.