Jaipur News : AB+ रक्तगटाऐवजी O+ रक्त चढवल्याने रुग्णानं हॉस्पिटलमध्येच सोडले प्राण

Jaipur : जयपूरमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. जयपूरच्या एका हॉस्पिटमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jaipur News
Jaipur NewsSaam Tv

Jaipur News Of Hospital:

जयपूरमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. जयपूरच्या एका हॉस्पिटमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सवाई मानसिंग हॉस्पिटमध्ये एका रुग्णाला दुसऱ्याच ब्लड ग्रुपचे रक्त दिले आहे. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल सरकारने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, बिंदीकुई शहरातील रहिवासी सचिन शर्माचा कोटपुतली शहरात अपघात झाला. त्यात हा तरुण गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला जयपूरमधील सरकारी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. उपचारादरम्यान चुकीच्या ब्लड ग्रुपचे रक्त दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

याप्रकरणी हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात चुकीच्या रक्त संक्रमणामुळे तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. परंतु रुग्णाची तब्येत खराब झाली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Jaipur News
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 'या' दिवशी होऊ शकतं जाहीर, जाणून घ्या किती टप्प्यात होऊ शकतं मतदान

सचिनचा अपघात खूपच भीषण होता. त्यात खूप जास्त रक्तस्त्राव झाला होता. सचिनला AB+ ब्लड ग्रुपचे रक्त हवे होते. परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून o+ रक्त चढवण्यात आले. त्यामुळे त्याची तब्येत खराब झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे.

Jaipur News
Stray Dog Age : कुत्र्यांचं आयुष्य ४ वर्षांनी घटलं; माणसाशी आहे थेट संबंध? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com