Chetan Bodke
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह सध्या काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.
सचिनने यावेळी गुलमर्गच्या खोऱ्यांमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
सोबतच सचिनने जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमधील एलओसीला भेट दिली. तसेच अमन सेतूसमोरील कमांड पोस्टवरील सैनिकांसोबत सचिनने संवाद साधला.
नुकतंच सचिनने ट्वीटर एक्सवर ट्रीप दरम्यानचे काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतोय.
सचिन, बायको अंजली आणि मुलगी सारा सध्या काश्मिर स्नो फॉलची मज्जा घेताना दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सचिन आणि त्याची फॅमिली काश्मीरच्या दौऱ्यावर आहे.
सचिन कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो.