Stray Dog Age : कुत्र्यांचं आयुष्य ४ वर्षांनी घटलं; माणसाशी आहे थेट संबंध? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Stray Dog News : महामार्गाच्या परिसरात आढळणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थमा आणि फुफ्फुसे काळी पडण्याचे आजार आढळून आले आहेत. तसेच परिसरातील कुत्र्यांचं आयुष्य ३ ते ४ वर्षांनी घटल्याची बाब एका रिसर्चमध्ये समोर आली आहे.
Stray Dog Age
Stray Dog Age Saam Digital
Published On

Stray Dog Age

ध्वनी आणि वायुप्रदुषण ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येमुने जसे मानवाला ग्रासले, त्याच पद्धतीने प्राणी-पक्ष्यांनाही त्याचा विळखा पडला आहे. महामार्गाच्या परिसरात आढळणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थमा आणि फुफ्फुसे काळी पडण्याचे आजार आढळून आले आहेत. तसेच परिसरातील कुत्र्यांचं आयुष्य ३ ते ४ वर्षांनी घटल्याची बाब एका रिसर्चमध्ये समोर आली आहे.

सकाळच्या धुक्यात फिरायला जावं का?

सध्या पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा असतो. सकाळी धुकं पसरलेलं असतं. धुक्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लोक सकाळी लवकर घराबाहेर पडतात. अशावेळी अनेक जण पाळीव कुत्र्यांना सोबत घेतात. मात्र, धुके समजून सकाळी लवकर घराबाहेर पडलेली ही मंडळी स्वत: सोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचेही आरोग्य धोक्यात घालत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार, पहाटे जे धुकं पसरलेलं असतं, ते आरोग्याला धोका पाहोचवणारं वायुप्रदुषण असल्याचं मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शवविच्छेदनात धक्कादायक माहिती समोर

हवेत मिसळलेले कार्बनचे घटक फुफ्फुसाला बाधा पोहोचवतात. त्यामुळे फुफ्फुसे निकामी होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. याबाबत मुंबईमध्ये झालेल्या एका मृत भटक्या कुत्र्याचं शवविच्छेदन नुकताच करण्यात आलं होतं, त्यात त्याचं फुफ्फुस कार्बनमुळे काळं पडून त्याचा मृत्यू झालंचं समोर आलं आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला. ठाणे-मुंबई महामार्ग परिसरात आढळून येणाऱ्या पाठीव आणि भटक्या कुत्र्यांनाही हा धोका आहे. महामार्ग आणि ज्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते, अशा ठिकाणी आढळणाऱ्या कुत्र्यांचं आयुर्मान ३ ते ४ वर्षांनी घटल्यांचं मायवेट्स चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरचे सचिव आणि ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. युवराज कागिनकर यांनी सांगितलं.

Stray Dog Age
Mumbai News: बाळ सतत रडतं म्हणून तोंडाला लावली चिकटपट्टी; BMCच्या तीन नर्सेसवर कारवाई

काय म्हणाले कागिनकर?

हवेतील कार्बनमुळे श्वसनाचे आणि निमोनियासारखे फफ्फुसाचे आजार होऊ शकतात. पालकांनी त्यांच्या पाळीव प्राणी, पक्ष्यांना सूर्य उगवल्यानंतर घराच्या बाहेर फिरायला घेऊन जायला हवं. कारण उन्हामुळे वातावरणातील कार्बनुयक्त फॉग वर निघून जातो. त्यामुळे वातावरण थोड्या प्रमाणात शुद्ध होण्यास मदत होते. पाळीव प्राण्यांची अशी काळजी घेतली जाऊ शकते, मात्र महामार्ग, सिग्नल, चौकालगत आढळणाऱ्या कुत्र्यांच्या काळजीचा प्रश्न आहे. त्यांची काळजी कोण घेतं.

भटक्या कुत्र्यांची कोण काळजी घेतं!

हवाच्या प्रदुषणामुळे कुत्र्यांमध्ये अस्थमा, लकवा, निमोनिया, श्वसन आणि फुफ्फुसाचे घातक आजार आढळून येत आहेत. मिरा-भाईंदर शहराच्या थोडं पुढे गेलं, तर त्या भागातील कुत्र्यांचं आयुर्मान १३-१४ वर्षांचं आढळून आलं आहे. मात्र ठाणे, मुबई शहरातील भटक्या कुत्र्यांचं आयुष्य अवघे ८ ते ९ वर्ष असल्याचं संशोधनात आढळूनआलं आहे.

Stray Dog Age
Spacecraft Land On Moon : अमेरिकेचं पहिलं खासगी अंतराळयान उतरलं चंद्रावर; ५० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर चंद्रावर घडणार मोठ्या घडामोडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com