Spacecraft Land On Moon : अमेरिकेचं पहिलं खासगी अंतराळयान उतरलं चंद्रावर; ५० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर चंद्रावर घडणार मोठ्या घडामोडी

Spacecraft Land On Moon : जवळपास 50 वर्षात प्रथमच अमेरिकन अंतराळयान चंद्रावर उतरले आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली अमेरिकन मिशन अपोलो 17 होती. या मोहिमेंतर्गत 1972 मध्ये चंद्रावर अंतराळ याने उतरण्यात आली होती. सध्या ओडिसियस लँडर हे यान चंद्रावर उतरले असून ह्यूस्टनच्या इंट्यूटिव्ह मशीन्सने यांची निर्मिती केली आहे.
Spacecraft Land On Moon
Spacecraft Land On MoonSaam Digital

Spacecraft Land On Moon

जवळपास 50 वर्षात प्रथमच अमेरिकन अंतराळयान चंद्रावर उतरले आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली अमेरिकन मिशन अपोलो 17 होती. या मोहिमेंतर्गत 1972 मध्ये चंद्रावर अंतराळ याने उतरण्यात आली होती. सध्या ओडिसियस लँडर हे यान चंद्रावर उतरले असून ह्यूस्टनच्या इंट्यूटिव्ह मशीन्सने यांची निर्मिती केली आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:53 वाजता त्याचे लँडिंग झाले. चंद्रावर उतरणारे हे खासगी कंपनीचे पहिले अंतराळयान ठरले असून अमेरिकन अवकाश उद्योगासाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे.

ओडिसियस लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं त्यावेळी या यानात काही तांत्रिक बिघाडामुळे टीमच्या अवकाशयानाशी संपर्क तुटला होता, मात्र यान सुरक्षित उतरले आहे आणि कार्यरत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता इथून मिशन कितीही पुढे जात असले तरी, लँडिंग हे व्यावसायिक अवकाशयान आणि अमेरिकन अवकाश उद्योगासाठी मैलाचा दगड मानला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण ध्रुवावर उतरणारा अमेरिका भारतानंतर दुसरा देश

अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. अमेरिकेचे हे मिशन ७ दिवस सक्रिय राहणार आहे. कारण थंडीमुळे अवकाशयान बिघडू शकते. यासह दक्षिण ध्रुवावर उतरणारा अमेरिका भारतानंतर दुसरा देश ठरला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला होता. ओडिसियसचे लँडिंग 14 फेब्रुवारी रोजी होणार होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलावे लागले.

Spacecraft Land On Moon
Mla Lasya Nanditha: BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचं अवघ्या ३७ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन, डिव्हाडरला धडकली कार

2026 मध्ये चंद्रावर मानव उतरण्याची तयारी

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या पाच देशांपैकी अमेरिका एक आहे. तथापि, हा एकमेव देश आहे ज्याचे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहेत. पुढील वर्षी पुन्हा चंद्राभोवती अंतराळवीर पाठवण्याचे अमेरिकेचे लक्ष्य आहे. याशिवाय, 2026 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होणार आहे, 50 वर्षांहून अधिक काळानंतर चंद्रावर पहिलं मानवाचं पाऊल पडणार आहे. पण तारीख वाढवली जाण्याचीही शक्यता आहे. यापूर्वी सरकारी अकाउंटेबिलिटी ऑफिसने, अंतराळयान बनवण्यात आलेले कष्ट आणि गुंतागुंत यामुळे २०२७ मध्ये लँडिंग होण्याची शक्यता असल्यांचं म्हटलं आहे.

Spacecraft Land On Moon
Shocking News: जिममध्ये व्यायाम करताना पोलीस अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदातच मृत्यूने गाठलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com