Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

Pune hidden Relaxing Places : पुण्यामध्ये कपल्ससाठी देखील फिरण्यासाठी आणि कँन्डल लाईट डिनरसाठी काही प्रसिद्ध आणि हिडन ठिकाणे आहेत. त्याबाबत जास्त कुणाला माहिती नाहीये.
Pune Travel
Pune Travel Saam TV

पुणे म्हणजे सर्वत्र वाहनांचा धूर, ट्रॅफीक जाम अशी दृष्य अनेकांच्या डोळ्यांसमोर येतात. तसेच गड किल्ले आणि सासरसबाग आपल्याला आठवतात. पुण्यामध्ये कपल्ससाठी देखील फिरण्यासाठी आणि कँन्डल लाईट डिनरसाठी काही प्रसिद्ध आणि हिडन ठिकाणे आहेत. त्याबाबत जास्त कुणाला माहिती नाहीये. त्यामुळे आज याच ठिकाणांची माहिती जाणून घेऊ.

Pune Travel
Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

लग्नानंतर हनिमून प्लान करत असाल तर तुम्ही देखील पुण्यातील या काही भन्नाट ठिकाणी भेट देऊ शकता. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर देखील काही जोडपी फस्ट अॅनीवर्सरीचं जंगी सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही ठिकाणे तुम्हाला नक्की आवडतील.

रुफटॉप डायनिंग

लग्नाचा वाढदिवस अधिक रोमॅन्टीक आणि छान हवा असेल तर तुम्ही रुफटॉप डायनिग करू शकता. येथे थोडी सजावट करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला येथे घेऊन येऊ शकता. असे केल्याने तुमच्या जोडीदाला देखील फार आनंद होईल.

छान थंड हवेसोबद चटपटीत स्वादिष्ट जेवणाचा अस्वाद घेण्याची बातच काही और आहे. पुण्यात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे रेस्टॉरंट आहेत.

पवना तलाव

पवना तलाव खास कॅम्पिंगसाठी फेमस आहे. तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला कॅम्पिंगची आवड असेल तर तुम्ही आवर्जुन येथे भेट द्या. लग्नाचा महिला वाढदिवस रात्रीच्यावेळी आकाशातील तारे मोजत या ठिकाणी फार छान साजरा होईल. येथे घालवलेले सर्व क्षण कायम तुमच्या स्मरणात राहतील. तुम्हाला कॅम्पिंग आवडत नसेल तर तुम्ही येथे फक्त फिरण्यासाठी जाऊ शकता.

पवना तलावाच्या ठिकाणी सु्र्योदय आणि सुर्यास्त पाहून तुमच्याही डोळ्याचं पारणं फिटेल. येथे एक रात्र कॅम्पिंगसाठी एका व्यक्तीचे ११९९ इतकी फी आहे. तर याची वेळ दुपारी ४ ते दुसऱ्या दिवशी ११ अशी आहे. तुमच्या पॅकेजमध्येच तुम्हाला तंबू, जेवण आणि अॅक्टीवीटी दिल्या जातात.

Pune Travel
Flipkart Super Cooling Days Sale: उन्हाळ्यात एसी घ्यायचा विचार करताय? फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com