Solapur : सोलापुरात शिष्यवृत्ती घोटाळा; ३.६२ कोटींची अफरातफर, तीन अधिकारी निलंबित

Solapur Labour Child Scholarship Scam : सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे ३.६२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Solapur : सोलापुरात  शिष्यवृत्ती घोटाळा; ३.६२ कोटींची अफरातफर, तीन अधिकारी निलंबित
Maharashtra Solapur Labour Welfare Board Scholarship FraudSaam Tv
Published On
Summary
  • सोलापूरमध्ये बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा घोटाळा उघड

  • प्राथमिक चौकशीत ३.६२ कोटी रुपयांचा घोटाळा समोर

  • तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  • चौकशी वाढल्यास घोटाळ्याची रक्कम १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Maharashtra Solapur Labour Welfare Board Scholarship Fraud सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांची मुले परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे दाखवण्यात आले. तसेच तेथील महाविद्यालयांची बोगस प्रमाणपत्रे दाखवून अधिकाऱ्यांनीच कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक चौकशीत सुमारे ३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोषसिंग राजपूत आणि उज्वल सूर्यवंशी यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. कामगारांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी ६० हजार रुपये शासनाकडून मिळतात. सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. बांधकाम कामगार कल्याण विभागाकडे यातील २२३ लाभाथ्यर्थ्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या पाल्यांच्या नावे पैसे उचलल्याची तक्रार दिली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन कामगार आयुक्तांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली.

Solapur : सोलापुरात  शिष्यवृत्ती घोटाळा; ३.६२ कोटींची अफरातफर, तीन अधिकारी निलंबित
Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती

त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी बांधकाम कामगारांच्या नावावर बोगस कार्ड तयार करून बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यात आल्याने शासनाची सुमारे आठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा तारांकित प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दाखल केला. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच विद्यमान कामगार आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली आणि ३ कोटी ६२ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तिघांवर निलंबनाची कारवाई केली.

Solapur : सोलापुरात  शिष्यवृत्ती घोटाळा; ३.६२ कोटींची अफरातफर, तीन अधिकारी निलंबित
Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सोलापूर जिल्ह्यात साधारण एक लाखांपेक्षा अधिक कामगारांची नोंद आहे. त्यापैकी तोंडी व लेखी अशा केवळ २२३ जणांनी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार शिष्यवृत्ती लाटल्याचा आकडा आठ कोटींच्या घरात आहे. तर चौकशीत हा आकडा आणखी वाढून १०० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांमधून बोलले जात आहे. चौकशी झाल्यास हा आकडा १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com