Shravan Vrat 2025 Saam TV
लाईफस्टाईल

Shravan Vrat : महाराष्ट्रात श्रावण कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या कोणते व्रत कोणत्या दिवशी करावे

Shravan Vrat 2025: श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण महिन्यात अनेक व्रत करायचे असतात. हे व्रत केल्याने घर सुख-समृद्धी नांदते. या व्रताबद्दलची सर्व माहिती जाणून घ्या.

Siddhi Hande

आषाढ महिना सुरु आहे. आषाढनंतर श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण महिन्यात अनेकांचे व्रत, उपवास असतात. त्यामुळे या महिन्याला खूप महत्त्व असते. श्रावणात व्रत केल्याने भविष्यात खूप चांगलं होतं, असं म्हणतात. त्यामुळे श्रावण महिन्यात सोमवारी आणि शनिवारी उपवास धरतात. तसेच श्रावणात अनेक सण-उत्सवदेखील असतात.

श्रावण महिन्यात व्रत, जलाभिषेक, रुद्राभिषेक, महामृत्यूंजय जप, कावड यात्रा निघते. या वर्षी ११ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत श्रावण महिना आहे. महाराष्ट्रात श्रावण महिना थोडा उशिरा सुरु होता. महाराष्ट्रात २५ तारखेपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. या काळात शिवज पूजा केली जाते. या काळीत प्रदोष व्रत, शिवरात्रि, हरियाली अमावस्य असणार आहे. या काळात कोण-कोणत्या सणाला काय व्रत करावे ते जाणून घ्या.

श्रावणातील व्रत आणि सण

११ जुलै २०२५- श्रावण मास सुरुवात

१४ जुलै २०२५- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, गजानन संकष्टी चतुर्थी

१५ जुलै २०२५- पहिला मंगला गौरी व्रत

१६ जुलै- कर्क संक्रांती

२१ जुलै २०२५- दुसरा श्रावणी सोमवार, कामिक एकादशी

२२ जुलै २०२५- प्रदोष व्रत

२३ जुलै २०२५- श्रावण शिवरात्रि

२४ जुलै २०२५- हरियाली अमावस्या, श्रावण अमावस्या, गुरु पुष्य योग

२७ जुलै २०२५- हरियाली तीज

२८ जुलै २०२५- तिसरा सोमवार, विनायक चतुर्थी

२९ जुलै २०२५- नागपंचमी

३० जुलै २०२५- कल्कि जयंती

४ ऑगस्ट- चौथा श्रावणी सोमवार

५ ऑगस्ट २०२५- श्रावण पुत्रदा एकदाशी

६ ऑगस्ट- प्रदोष व्रत

९ ऑगस्ट २०२५- रक्षाबंधन, श्रावण पोर्णिमा व्रत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : दिरासोबतच्या प्रेम प्रकरणात पती अडसर, कुख्ख्यात शुटरकडून नवऱ्यावर गोळी चालवली; पुढे जे घडलं ते भयंकर...

Chanakya Niti : या गोष्टींवर पाय लावल्याने आयुष्यभर भोगावी लागतील पापं

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT