Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमा निमित्त या ३ खास गोष्टी घरात आणा, मिळेल लक्ष्मी आणि गुरुंचा आशीर्वाद

Dhanshri Shintre

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा या वर्षी १० जुलै रोजी साजरी होणार असून, गुरुंच्या पूजेसाठी महत्वाचा दिवस आहे.

गुरुपूजा

हिंदू धर्मानुसार आषाढ पौर्णिमेला गुरुपूजा केली जाते, हा दिवस गुरुंचे सत्कार करण्यासाठी खास मानला जातो.

वेदव्यास यांचा जन्म

असे मानले जाते की आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस पवित्र मानला जातो.

व्यास पौर्णिमा

म्हणूनच अनेक लोक आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी करतात आणि वेदव्यास यांना आदरांजली अर्पण करतात.

लक्ष्मी आणि विष्णू

या दिवशी अनेक श्रद्धाळू गुरुंबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचीही भक्तिभावाने पूजा करतात आणि आशीर्वाद मागतात.

या वस्तू घ्या

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घरात या वस्तू आणल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते.

भगवद्गीता

गुरुपौर्णिमेला भगवद्गीता घरी आणल्यास किंवा तिचे पठण केल्यास मन:शांती आणि आध्यात्मिक लाभ मिळतो, असे मानले जाते.

श्री यंत्र

गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री यंत्र घरात आणल्यास शुभ मानले जाते, कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

लाफिंग बुद्धा

गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाफिंग बुद्धा घरात आणल्याने आनंद आणि शांती वाढते, त्यामुळे हे विसरू नये.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

येथे क्लिक करा