Shravan 2025: श्रावण महिन्यात शिवलिंगावर कसे अर्पण करावे बेलपत्र? जाणून घ्या योग्य पद्धत

Dhanshri Shintre

श्रावण महिना

श्रावण महिन्याला सुरुवात २५ जुलैपासून होणार असून, हिंदू धर्मात या काळात भगवान शिवाची विशेष पूजा करण्यास अत्यंत महत्त्व दिलं जातं.

आर्थिक अडचणी

श्रावणात भगवान शिवाची भक्ती केल्यास अडथळे दूर होतात, प्रगती होते, अडकलेली कामे पूर्ण होतात आणि आर्थिक अडचणीही हळूहळू दूर होतात.

चुकीच्या पद्धतीने बेलपत्र अर्पण

श्रावणात शिवलिंगावर चुकीच्या पद्धतीने बेलपत्र अर्पण केल्यास भक्तांना लाभ मिळत नाही आणि देवाची नाराजी ओढवते, त्यामुळे योग्य पद्धतीने पूजा आवश्यक आहे.

योग्य पद्धत

आज आपण जाणून घेणार आहोत, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत, ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आशीर्वाद प्राप्त होतो.

कसे अर्पण करावे?

शिवलिंगावर बेलपत्र कधीही भांड्यातून अर्पण करू नये, आपल्या हाताने अर्पण करावे, अन्यथा पूजा अपूर्ण मानली जाते आणि योग्य फळ मिळत नाही.

बेलपत्राची दिशा

बेलपत्र अर्पण करताना दिशा महत्त्वाची आहे, बेलपत्र उलटे ठेवावे म्हणजेच त्याचा गडद भाग शिवलिंगावर असावा तेव्हाच पूजा योग्य मानली जाते.

बेलपत्र कधी तोडावे?

सोमवार किंवा चतुर्दशीला बेलपत्र तोडणे अशुभ मानले जाते, यामुळे दुर्देव येऊ शकते. बेलपत्र तोडण्यासाठी रविवार योग्य दिवस मानला जातो.

NEXT: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

येथे क्लिक करा