Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Dhanshri Shintre

श्रावण महिना

श्रावण महिना लवकरच सुरू होतोय, हा महिना भगवान शिवांना अर्पण असून भक्त महिनाभर भक्तीभावाने पूजा करतात.

शिवलिंग पूजा

शिवलिंग पूजेसाठी काही नियम आहेत; काही वस्तू अर्पण करणे टाळावे, अन्यथा ते अशुभ समजले जाते.

सविस्तर माहिती

शिवलिंग पूजा करताना कोणत्या वस्तू अर्पण करणे टाळावे, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हळद व सिंदूर

शिवलिंगावर हळद व सिंदूर टाकणे टाळावे, कारण त्या गोष्टी सौंदर्यवर्धक मानल्या जातात आणि पूजा नियमांचे उल्लंघन होते.

केतकीचे फूल

शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे टाळावे; महादेवाच्या क्रोधामुळे केतकीला पूजेत वापरू नका असा शाप आहे.

शंखाचा वापर

शिवलिंगावर शंखाचा वापर अभिषेकासाठी करणे टाळावे; कारण शंख पूजा मध्ये महत्त्वाचा आहे, पण शिवलिंगावर नाही.

तीळ

शिवलिंगावर जलाभिषेक करताना तीळ अर्पण करणे टाळावे कारण हे नियमाप्रमाणे योग्य नाही.

तुटलेला भात (कणी)

शिवलिंगावर तुटलेला भात अर्पण करणे टाळावे, कारण हे कृती अशुभ मानली जाते, असे समजले जाते.

तुळशी

तुळशीची पूजा महत्वाची असली तरी ती कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये, असे नियम सांगतात.

नारळ पाणी

शिवलिंगावर नारळाचे पाणी वापरून अभिषेक करणे टाळावे; असे केल्याने आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे, असे म्हणतात.

NEXT: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

येथे क्लिक करा