Dhanshri Shintre
पंढरपूर प्रमाणे साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळत आहे.
साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.
शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त आज शिर्डीत साईसमाधीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत.
कर्नाटक येथील साईभक्त एस. प्रकाश यांच्या देगणीतून मंदिर आणि परीसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
साईबाबांना कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह आज तुळशीपत्राची माळ घालण्यात आली असून विठ्ठलाची प्रतीमा साईबाबांच्या समाधीवर ठेवण्यात आली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आज प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.
मंदिरातील सजावट आणि सणाचा उत्साह भाविकांच्या मनाला भावणारा ठरला.