Dhanshri Shintre
आषाढी एकादशीला देवशयनी, महाएकादशी किंवा मोठी एकादशी असेही म्हणतात, ती धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या दिवशीपासून चातुर्मास सुरू होतो, अशी श्रद्धा आहे की भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात योगनिद्रेत विश्रांती घेतात.
म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि टाळावं याची माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
या दिवशी भक्त उपवास करून भगवान विष्णूची भक्तीभावाने पूजा-अर्चा व प्रार्थना करतात आणि आध्यात्मिक साधना करतात.
भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
उपवास नसलात तरी या दिवशी मांसाहार, कांदा-लसूण, मसालेदार अन्न टाळावं, कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
या दिवशी उपवास नसलात तरी अन्न, वस्त्र, पाणी व पैसे दान करणे पुण्यकारक मानले जाते आणि शुभ फल मिळते.
एकादशीच्या दिवशी विशेषतः भात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ टाळावेत, कारण त्याचे सेवन वर्ज्य मानले जाते.