Monday Horoscope : शत्रूंवर मात करून पुढे जाल; तूळसह ४ राशींच्या लोकांसठी सोमवार गेमचेंजर ठरणार, नशीब चमकणार

Monday Horoscope in Marathi : तूळसह ४ राशींच्या लोकांसठी सोमवार गेमचेंजर ठरणार आहे. काही जणांचं नशीब चमकणार आहे. वाचा सोमवारचं राशीभविष्य एका क्लिवकर
Horoscope News
Horoscope Today Saam tv
Published On

आजचे पंचांग

सोमवार,१९ मे २०२५,वैशाख कृष्णपक्ष.

तिथी-षष्ठी ०६|१२

सप्तमी २९|५२

रास-मकर

नक्षत्र-श्रवण

योग-ब्रह्मा

करण - वणिज ०६|१२

विष्टीकरण १८|०७

दिनविशेष-क्षयतिथी

मेष - राजकीय क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा आजचा दिवस आहे. तुमचं कार्यक्षेत्र एकूणच रुंदावणार आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर सुसंवाद साधून योग्य निर्णय घ्याल.

वृषभ - जिद्द आणि चिकाटीने काम कराल. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. भाग्यकारक घटनांचा कालावधी आज नक्कीच आहे असे म्हणायला हरकत नाही.

मिथुन - व्यवसायातील आर्थिक निर्णय जर लांबणीवर पडले होते तर आज ते मार्गी लागतील. महत्त्वाची कामे आज मात्र नकोतच शक्यतो पुढे ढकलावीत . आपला एकट्याचा मार्ग आहे हे स्वीकारावे लागेल.

Horoscope News
Vastu Upay: दुकानदार ग्लासात लिंबू का ठेवतात? कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

कर्क - आपल्या मतांविषयी आणि कामाविषयी आग्रही राहाल. ठरवाल तेच होईल. मनोबल उत्तम राहील. इतरांच्या कुबड्यांची आज आपल्याला गरज भासणार नाही.

सिंह - हित शत्रूंवर मात करत पुढे जाल. ठरवून केलेल्या गोष्टी अडचणीच्या असल्या तरी मार्गी लागतील. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अपमान सुद्धा सहन करावे लागतील.

कन्या - तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणारे आहेत. बौद्धिक क्षेत्रामध्ये विशेष प्रगती होईल. सृजनशीलता वाढेल. विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात वेगळा टर्निंग पॉईंट येताना दिसेल.

Horoscope News
Vastu Tips: वास्तुनुसार घरात गुलाबी रंग वापरणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

तूळ - प्रॉपर्टी से निगडित व्यवहार असतील तर ते मार्गी लागतील. शासकीय कामे योग्य प्रकारे पार पडतील. कुटुंबीयांच्या बरोबर आनंदाने दिवस घालवाल.

वृश्चिक - भागीदारी व्यवसाय आज सुखाचा ठरणार आहे. त्यामध्ये सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. पत्र व्यवहार विनासायस पार पडतील. छोट्या अडचणी सहजगत्या दूर होतील.

धनु - धनसंचय चांगला होईल. कदाचित मोठी गुंतवणूक करण्याचा आज मानस असेल तर ती करायला हरकत नाही. ज्येष्ठांचे निर्णय आणि सल्ला यामध्ये आज महत्त्वाचा ठरेल.

Horoscope News
Vastu Tips Money: पुजेच्या वेळेस घरात कापूर अन् लवंग जाळल्याने कोणकोणत्या समस्या दूर होतात?

मकर - आज शरीरातील ढिलेपणा कमी होईल. जरा उत्साह आणि उमेद वाढेल. आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात आनंद लाभेल. प्रियजनांमध्ये व्यस्त रहाल. दिवस सुखी आहे.

कुंभ - विरोधक तर आपल्या टप्प्याटप्प्यावर उभे आहेत. आज मात्र एक वेगळी शक्ती आपल्या पाठीशी आहे. आपण या विरोधकांवर मात कराल. शत्रुपीडा होईल असे दिसत नाही.

मीन - काहीना आज कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. पैशाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. संततीसौख्य सुद्धा भरभरून मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com