Vastu Tips: वास्तुनुसार घरात गुलाबी रंग वापरणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Dhanshri Shintre

सौंदर्याचं प्रतीक

गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि सौंदर्याचं प्रतीक मानला जातो, पण वास्तुशास्त्रात तो खरोखरच घरासाठी अनुकूल आहे का, हे जाणून घेऊया.

मानसिक शांतता

गुलाबी रंगाची सौम्य छटा उबदारपणा आणि मानसिक शांतता देते. वास्तुशास्त्रात तो अग्नी तत्त्वाशी संबंधित मानला जातो आणि प्रेम वृद्धिंगत करतो.

सकारात्मक ऊर्जा

कुटुंबातील आणि जोडप्यांतील नाते दृढ करण्यासाठी नैऋत्य दिशेला गुलाबी रंग वापरणे वास्तुशास्त्रानुसार फायदेशीर ठरते. सकारात्मक ऊर्जा वाढते.

गुलाबी रंग

गुलाबी रंग स्त्रीत्व, कोमलता आणि काळजीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे नर्सरी आणि व्हॅनिटी रूमसाठी तो आदर्श पर्याय ठरतो.

आनंददायक वातावरण

गुलाबी रंगाची छटा प्रकाश परावर्तित करत घरात उजळपणा आणते. त्यामुळे आनंददायक वातावरण निर्माण होते आणि नैराश्याची भावना दूर होण्यास मदत होते.

मानसिक शांतता

मास्टर बेडरूमसाठी गुलाबी रंग उपयुक्त आहे. तो मानसिक तणाव कमी करून शांतता वाढवतो आणि आरामदायक झोपेसाठी मदत करतो.

NEXT: प्रवेशद्वारावर स्वस्तिक का काढावे? जाणून घ्या यामागची वास्तुशास्त्रीय कारणे

येथे क्लिक करा