Shravan Special  SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan Special : ना कांदा, ना लसूण तरीही बनेल हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही, चव जिभेवर रेंगाळत राहील

Gravy Recipe : श्रावणात बरेच लोक कांदा, लसूण खात नाहीत. त्यामुळे भाजी मसालेदार बनत नाही. मात्र आता कांदा, लसूणचा वापर न करता तुम्ही चमचमीत ग्रेव्ही बनवू शकता. सोपी रेसिपी जाणून घ्या.

Shreya Maskar

श्रावणात आहारामध्ये विशेष काळजी घेतली जाते. कारण श्रावणात अनेक पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यात कांदा आणि लसूण यांचा समावेश देखील आहे.श्रावण पावसाळ्यात येत असल्यामुळे कांदा आणि लसूण खाणे टाळे जाते. कारण पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि या वातावरणात हे पदार्थ वातूळ असतात. कांदा, लसूण श्रावणात खाणे बंद असल्यामुळे अनेक महिलांना भाजी बनवताना ग्रेव्ही कशी तयार करायची हा प्रश्न पडतो. कारण कोणत्याही भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही खूप महत्त्वाची आहे. ग्रेव्ही शिवाय कोणताही पदार्थ विशेषतः भाजी स्वादिष्ट होत नाहीत.

कांदा-लसूण न घालता कशी करायची ग्रेव्ही?

श्रावणात कांदा, लसूण न घालता झटपट ग्रेव्ही करा आणि भाजीची चव वाढवा.

साहित्य

  • टोमॅटो

  • वेलची

  • दालचिनी

  • काळी मिरी

  • लवंग

  • मीठ

  • शिमला मिरची

  • गाजराचे काप

  • कोथिंबीर

  • काजू

  • आलं

  • हिरवी मिरची

  • काश्मिरी लाल तिखट

  • धने पूड

  • हळद

  • तेल

कृती

कांदा-लसूण न घालता ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो, शिमला मिरची कापून घ्या. त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवा आणि त्यात टोमॅटो, शिमला मिरची, गाजराचे काप हे पदार्थ टाका. दालचिनी, काळी मिरी, लवंग, हिरवी मिरची, आलं, काश्मिरी लाल तिखट, धने पूड, हळद इत्यादी मसाले टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. आता गॅस मंद आचेवर ठेवून कुकरच्या ४ शिट्टया काढून घ्या. कुकर थोडा थंड झाल्यावर मिश्रणातील तमालपत्र काढून बाकी सर्व मिश्रण मिक्सरला छान वाटून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरेपूड, काळी मिरी टाकून फोडणी करा. त्यानंतर यात मिक्सरला पेस्ट केलेली ग्रेव्ही टाकून ९ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. अशाप्रकारे कांदा, लसूण न वापरता झणझणीत ग्रेव्ही तयार झाली. कोणत्याही मसालेदार भाजीत घालून याची चव ‌वाढवा. श्रावणात ही ग्रेव्ही भाज्यांची चव वाढवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT