Monsoon Special : पावसाळ्यात 'हा' स्पेशल वडापाव घरी नक्की ट्राय करा, चवीला सुपरटेस्टी अन् बनवायला सिंपल

Chili Cheese Vada Pav Recipe : पावसाळ्यात गरमागरम आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर, घरीच झटपट 'चिली चीज वडापाव' बनवा, घरची मंडळी बोटं चाटत राहतील.
Chili Cheese Vada Pav Recipe
Monsoon SpecialSAAM TV
Published On

वडापाव हा महाराष्ट्राची शान आहे. मुंबई मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्या पोटाला आधार म्हणजे वडापाव. वडापाव फक्त नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. बदलत्या काळानुसार बाजारात वडापावचे अनेक प्रकार आपल्याला खायला मिळतात. मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूडमध्ये वडापावची गणना केली जाते. वडापावची वाढती क्रेझमुळे अनेक नवीन चवीचे वडापाव चाखायला मिळतात. आज आपण सुद्धा असाच एक नवीन स्टाइलचा वडापाव बनवायला शिकूया. पावसाळ्यात बाहेर न जाता घरीच झटपट 'चिली चीज वडापाव' बनवा. सिंपल रेसिपी नोट करा.

चिली चीज वडा पाव

साहित्य

  • बटाटा

  • बेसन

  • तूप

  • कढीपत्ता

  • मोहरी

  • कोथिंबीर

  • साखर

  • लिंबाचा रस

  • कांदा

  • लसूण

  • मोझेरेला चीज

  • मीठ

  • हळद

  • लाल मिरची पावडर

  • हिरवी मिरची

  • बेकिंग सोडा

  • चिंचेची चटणी

  • पाव

  • चिली फ्ले

  • चिली फ्लेक्स

  • मका

Chili Cheese Vada Pav Recipe
Medu Vada : १ थेंबही तेल न वापरता घरी १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत मेदूवडा, नोट करा सोपी रेसिपी

कृती

चिली चीज वडा पाव बनवण्याची सर्वप्रथम बटाटा आणि मका उकडून चांगला मॅश करून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, लसूण, मोहरी, हिरवी मिरची आणि मीठ घालून छान परतून घ्या. या मिश्रणात मॅश केलेले बटाटे, मका , तिखट मसाला, धणे पावडर आणि मोहरी घाला. या मिश्रणाची चव आणखी वाढवण्यासाठी बेसन, लिंबाचा रस आणि साखर घालून मिक्स करून घ्या. मिश्रण २ ते ३ मिनिटे वाफवून झाल्यावर गॅस बंद करा.

आता एका भांड्यात बेसन, हळद, बेकिंग सोडा आणि मीठ घालून थोड घट्टसर सारण बनवून घ्या. या मिश्रणात तेलाचे काही थेंब टाका. वडे तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. बटाट्याचे मिश्रण बेसनाच्या सारणामध्ये घोळवून गरम तेलात सोडा आणि गोल्ड फ्राय करून घ्या. पा‌व खुसखुशीत करण्याठी तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या. वडापा‌वच्या दोन्ही बाजूंना पुदिन्याची चटणी लावा. आता तयार झालेला वडा मध्यभगी तोडून त्यात चिंचेची चटणी, लसूण-आलं पेस्ट, चिली फेक्स आणि मोझेरेला चीज घालून वडा पा‌‌वामध्ये घाला. अशा प्रकारे घरीच स्ट्रीट स्टाईल चिली चीज वडा पाव तयार झाला.

Chili Cheese Vada Pav Recipe
Shravan Special : उपवासाला खिचडीला करा बाय बाय; बनवा हेल्दी राजगिरा लाडू, एकदा खाल तर खातच रहाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com