Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

मराठी डिजिटल पत्रकारितेमध्ये ई-सकाळने पुन्हा एकदा कॉमस्कोर रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. जानेवारी महिन्यात विक्रमी युजर्सनी वेबसाइटला भेट दिली असून वाचकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
ई-सकाळsaam tv
Published On

डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा प्रभाव वाढताना दिसतोय. बदलत्या काळानुसार पत्रकारांनी डिजिटल माध्यमांना स्विकारून करत मराठी डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा दिली आहे. अशातच दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही ई-सकाळने उल्लेखनीय कामगिरी करत कॉमस्कोरमध्ये पहिलं स्थान पटकावलंय.

वाचकांपर्यंत अचूक आणि विश्वासार्ह बातमी पोहोचवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मराठी वेबसाइट्समध्ये ई-सकाळने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. अनेक वर्षांपासून लोकांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या पोर्टलला डिजिटल क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय.

E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
Heart Attack: झोपेतून उठताच थकवा जाणवतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ई-सकाळ वेबसाइटवर नेहमीच वाचकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बातम्या, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील ताज्या अपडेट्स दिले जातात. गेल्या सुमारे २५ वर्षांपासून या वेबसाइटने सातत्याने चांगली कामगिरी करत वाचकांचा विश्वास जपलाय. याच विश्वासाच्या बळावर वाचकांनी ई-सकाळला मराठी डिजिटल माध्यमांमध्ये क्रमांक एक स्थान मिळवून दिलंय.

विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात ई-सकाळ वेबसाइटला सुमारे १९.५ मिलियन युजर्सनी भेट दिली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जातोय. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही या पोर्टलसाठी आनंदाने झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार ई-सकाळने ७.३ कोटी युजर्सचा टप्पा देखील पार केला आहे.

E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

अचूकता, वेग आणि तथ्यांची पडताळणी यांवर भर देऊन सादर केल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे वाचकांचा विश्वास अधिक वाढला आहे. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचं कव्हरेज देण्याबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी खास तयार केलेला मल्टिमीडिया कंटेंटही वाचकांचं लक्ष वेधून घेतोय.

E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
Chest Pain: हार्ट अटॅक अन् जळजळ यातला फरक कसा ओळखायचा? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण लक्षणे

डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असतानाही दर्जेदार आणि विश्वासार्ह पत्रकारितेच्या बळावर ई-सकाळने आपली आघाडी कायम ठेवलीये. मोबाईल-फर्स्ट या धोरणाचा प्रभावी वापर केल्यामुळे विशेषतः तरुण वाचक मोठ्या प्रमाणात या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होताना दिसताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com