गुरुवारी शिवयोग हा अत्यंत शुभ मानला जातो.
व्यवसायाची पायाभरणी मजबूत करण्यासाठी मातीचा घडा वाहून टाकावा.
नागकेशराच्या फुलाची पूजा पैशांच्या अडचणी दूर करते.
गुरुवार 18 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 37 मिनिटांपर्यंत शिवयोग आहे. शिवयोग हा अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. विशेषत: गुरुवारी या शुभ योगात केलेले काही सोपे उपाय आयुष्यात सुख-समृद्धी देऊ शकतात. हे उपाय केल्यास करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. गुरुवातरच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.
जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर स्पर्धकांच्या तुलनेत आपली पायाभरणी भक्कम करायची असेल, तर गुरुवारी मातीचा एक रिकामा घडा घ्या. त्या घड्यावर काजळाचा टिळा लावा आणि झाकण लावून तो घडा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. असं केल्याने व्यवसायाचा वेग वाढेल आणि पायाभरणी अधिक मजबूत होईल.
आयुष्यात कायम सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी गुरुवारी नागकेशराच्या झाडाला प्रणाम करा आणि त्याची विधीपूर्वक पूजा करा. जर झाड उपलब्ध नसेल तर पंसारीकडून नागकेशराचे कोरडे फूल किंवा लाकडाचा तुकडा आणून त्याला नमस्कार करा आणि तो दिवसभर आपल्या जवळ ठेवा.
जर तुम्हाला पैशांशी संबंधित अडचणी असतील तर गुरुवारी नागकेशराचे एक फूल घेऊन ते आपल्या देवघरात ठेवा आणि त्याची पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फूल देवघरातून काढून आपल्या ऑफिसच्या रोकडपेटीत ठेवा. यामुळे पैशांची अडचण दूर होईल.
जर मेहनत आणि उत्पन्न चांगलं असूनही हातात पैसे साठत नसतील तर गुरुवारी नागकेशराचे एक फूल लाल कापडात बांधून आपल्या जवळ ठेवा. काही दिवसांतच खर्चावर नियंत्रण येईल आणि बचत वाढेल.
गुरुवारी नागकेशराच्या झाडाची फुलांसह असलेला फोटो आपल्या घराच्या पूर्व दिशेला लावा. घरातून बाहेर पडताना तो फोटो नजरेस पडेल असा ठेवा. इंटरनेटवरूनही सुंदर फोटो छापून लावू शकता. यामुळे जीवनाची गती सुगमतेने पुढे सरकत राहते.
गुरुवारी तांब्याचं एक नाणं किंवा छोटासा तुकडा दिवसभर आपल्या जवळ ठेवा. नंतर तो आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि इतर स्थितीतही सुधारणा होईल.
गुरुवारी शिवयोग किती वाजता संपतो?
गुरुवारी रात्री 9:37 वाजता शिवयोग संपतो.
व्यवसायाची पायाभरणी मजबूत करण्यासाठी कोणता उपाय करावा?
मातीचा घडा काजळाचा टिळा लावून वाहून टाकावा.
पैशांची अडचण दूर करण्यासाठी कोणता उपाय करावा?
नागकेशराचे फूल ऑफिसच्या रोकडपेटीत ठेवावे.
बचत वाढवण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर आहे?
नागकेशराचे फूल लाल कापडात बांधून जवळ ठेवावे.
सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय करावे?
गुरुवारी तांब्याचे नाणे जवळ ठेवून तिजोरीत ठेवावे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.