Ganesh Puja Niyam: पुजेवेळी चुकूनही गणपतीला अर्पण करू नका 'या' गोष्टी; नाराज होऊ शकतो बाप्पा!

Ganesh Puja Niyam: येत्या ७ तारखेला गणेश चतुर्थी असून अनेकांच्या घरी या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. दरम्यान श्रीगणेशाला पूजेत कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत, ते पाहूया.
Ganesh Puja Niyam
Ganesh Puja Niyamsaam tv
Published On

हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ काम करताना पहिल्यांदा गणपतीची पुजा केली जाते. शनिवारी गणेश चतुर्थी असून आपल्यापैकी अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणपती बाप्पाची अनेक नावं असून सर्वजण त्याच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो.

शनिवारी गणपतीचं आगमन होत असून या काळात लोक बाप्पाची पूजा करतात. मात्र गणपतीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर पुजेदरम्यान काही चुका झाला तर बाप्पा नाराज होण्याची शक्यता असते. श्रीगणेशाला पूजेत कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत, ते पाहूयात.

पुजेदरम्यान चुकूनही अर्पण करू नका या गोष्टी

शास्त्रानुसार, गणपतीची पुजा करताना तुळशीच्या पानाचा कधीही वापर करू नये. असं मानलं जातं की, तुळशीमध्ये मां लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते. त्यामुळे गणपतीसमोर कधीही तुळशीचं पान अर्पण करू नये.

Ganesh Puja Niyam
Ganesh Chaturthi 2024: कलियुगातही प्रकट होणार भगवान गणेश, पाहा कसा असणार गणपतीचा हा अवतार?

काळ्या रंगाच्या गोष्टी

याशिवाय गणपती बाप्पाची पुजा करताना कोणत्याही काळा रंगाच्या गोष्टींचा समावेश करू नये. काळ्या रंगाची गोष्ट ही यमाची निशाणी मानली जाते. त्यामुळे यांचा पुजेच्या साहित्यात वापर करणं अशुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे केळ्याच्या पानाचाही वापर करू नये, असं म्हटलं जातं.

पुजेच्या ताटात काय सामान ठेवावं?

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. त्यामुळे पुजेच्या ताटामध्ये मोदकाचा समावेश असला पाहिजे. पुजेच्या ताटात मोदक असल्याने गणपती प्रसन्न होतो, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पुजेच्या ताटात दुर्वा, कच्ची हळद, पिवळा धागा यांचाही समावेश असला पाहिजे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Ganesh Puja Niyam
Ganeshotsav Travel : गणपती बाप्पा मोरया! परदेशातही आहेत गणरायाची मंदिरं, तुम्हाला माहित आहेत का ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com