Budhwar Ganesh Puja: गणपती बाप्पााच्या आशिर्वादासाठी करा 'हे' चमत्कारी उपाय; करियर आणि बिझनेसमध्ये मिळेल चांगली संधी

Budhwar che Upay: बुधवार हा गणपतीला समर्पित असल्याचं मानलं जातं. या दिवशी घेतलेले काही सोपे पण प्रभावी उपाय जीवनातील अडथळे दूर करतात. त्याचप्रमाणे आणि करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता असते.
Lord Ganesha
Lord Ganeshasaam tv
Published On

गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी बुधवार हा अगदी शुभ दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील समस्या दूर होतात असं मानलं जातं. याशिवाय हे उपाय करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक प्रगतीसोबतच इच्छित यश देखील मिळते.

बुधवारी केलेल्या पूजा आणि उपाय यामुळे केवळ भगवान गणेशच प्रसन्न होत नाहीत तर बुध ग्रह देखील बलवान होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध कमकुवत असेल तर हा दिवस विशेष फायदेशीर ठरू शकणार आहे. आजच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.

Lord Ganesha
Kendra Trikon Rajyog: जूनमध्ये 'या' ३ राशींचं नशीब पालटणार; पैशांसह तुम्हाला मिळणार पद-प्रतिष्ठा

बुधवारी गणपतीची पुजा का मानली जाते खास?

हिंदू धर्मानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला आहे. बुधवार हा दिवस विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीला समर्पित असून हा दिवस बुध ग्रहाशी देखील संबंधित आहे. ज्याला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी गपणतीची पुजा खास मानली जाते.

पिवळ्या चंदनाने तिलक लावा

बुधवारी योग्य विधींनी गणपतीची पूजा करावी. या पूजेदरम्यान गणपती बाप्पाला पिवळ्या चंदनाचा टिळा लावा. हाच टिळा तुमच्या कपाळावरही लावा. असं केल्याने भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळतात. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात. या दिवशी गणपती मंदिरात जा आणि त्यांना दुर्वा आणि लाडू अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार, दुर्वा आणि लाडू हे गणपतीला खूप प्रिय आहेत.

Lord Ganesha
Ardhakendra Yog: 18 मे पासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बुध-शनी बनवणार पॉवरफुल योग

वैवाहिक जीवनात प्रेम मिळेल

जर तुम्हाला बुधवारी तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि स्थिरता आणायची असेल, तर हळदीमध्ये थोडं तूप मिसळून गणपतीला तिलक लावा. याशिवाय एक तुपाचा दिवाही लावा. हा उपाय वैवाहिक जीवन गोड आणि आनंदी बनवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही सततच्या कर्जाने त्रासलेले असाल तर तुम्ही बुधवारी 'ऋणहर्ता गणेश स्तोत्र' वाचलं पाहिजे. या उपायाने केवळ कर्जातून मुक्तता मिळत नाही तर जीवनात आर्थिक स्थिरता येते.

Lord Ganesha
Mangal Gochar: जून महिन्यात भूमिपूत्र मंगळ सूर्याच्या राशीत करणार प्रवेश; 'या' राशींसोबत शुभ गोष्टी घडणार, मिळणार संपत्ती-यश

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com