Samsung Galaxy A05 Saam Tv
लाईफस्टाईल

Samsung Galaxy A05 स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरासह मिळतेय दमदार बॅटरी, किंमतही खिशाला परवडणारी

Samsung Galaxy A05 launched in India: सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy A05 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत अगदी खिशाला परवडणारी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samsung Galaxy A05 Price And Features:

स्मार्टफोन घेताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. स्मार्टफोनचा कॅमेरा, रॅम, स्टोरेज या गोष्टींचा विचार करुनच आपण स्मार्टफोन घेतो. मात्र, मोबाईल घेताना सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. बजेटमध्ये चांगल्या क्वॉलिटीचा स्मार्टफोन घ्यायचा विचार तुम्हीदेखील करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सॅमसंग कंपनीने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे.

कंपनीने Samsung Galaxy A05 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या नवीन स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

किंमत

कंपनीने अगदी बजेट फ्रेंडली किंमतीत हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटसाठी आहे. तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे.

हा नवीन स्मार्टफोन तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. लाइट ग्रीन, ब्लॅक आणि सिलव्हर अशा पर्यांयामध्ये स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोरमधून खरेदी करु शकता.

फिचर्स

Samsung Galaxy A05 मध्ये 6.7 इंचचा HD+LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसह येतो. स्मार्टफोन Android 13 वर आधारित असून One UI 5.1 Core OS वर काम करतो. या डिव्हाइसमध्ये अनेक अपडेट्स मिळतील.

या स्मार्टफोनमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज या दोन प्रकारात तुम्ही स्मार्टफोन विकच घेऊ शकता. फोनमध्ये 50MP प्राथमिक लेन्स तर 2MP सेकंडरी लेन्स देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT