Dry Eye Syndrome : प्रदूषणामुळे डोळे पडताय कोरडे? ही लक्षणे दिसल्यास वेळीच घ्या काळजी

Air Pollution Affect Eye : हवेतील प्रदूषणाचा डोळ्यांसाठी हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Dry Eye Syndrome
Dry Eye Syndrome Saam Tv
Published On

Winter Eye Care Tips :

वाढते प्रदूषण आणि हिवाळ्यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. बदलत्या ऋतूचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो डोळ्यांवर. हवेतील प्रदूषणाचा डोळ्यांसाठी हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हवामानात गारवा जाणवू लागला की, डोळे कोरडे होऊ लागतात. या समस्येला ड्राय आय सिंड्रोम असे म्हटले जाते. ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? त्यावर उपचार कसे कराल? जाणून घेऊया सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, ड्राय आय सिंड्रोममध्ये डोळ्यांच्या अश्रूवर परिणाम होतो. डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी टीयर फिल्म ही आवश्यक असते. जर यामध्ये समस्या निर्माण झाल्या की, धुसर दिसू लागते. डोळ्यात (Eye) अश्रू नसल्यामुळे किंवा ते लवकर कोरडे झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. यामुळे डोळ्यांची सतत जळजळ होणे, खाज सुटणे किंवा धुसर दिसते.

Dry Eye Syndrome
Burnout Syndrome : नोकरी करणाऱ्यांमध्ये 'बर्नआउट सिंड्रोमचा' धोका अधिक, लक्षणे काय? जाणून घ्या सविस्तर

2. लक्षणे

  • डोळ्यांची जळजळ

  • धूसर दृष्टी

  • कोणताही प्रकाश सहन न होणे

  • डोळ्यातील श्लेष्मा

  • डोळे उघडताना अडचण येणे

  • सतत डोळ्यांना खाज सुटणे

  • डोळे लाल होणे

  • डोळ्यातून पाणी (Water) न येणे

3. उपचार काय?

1. ब्रेक घ्या

वाढत्या स्क्रीन टाइमचा सगळ्यात जास्त परिणाम (Side Effects) हा आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांच्या आतील भागांवर हानिकारक परिणाम होतात. जर तुम्ही सतत स्क्रीनचा वापर करत असाल तर काही मिनिटांसाठी ब्रेकही घ्या.

Dry Eye Syndrome
Air Pollution Affects Eye : वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, सतत खाज सुटते; कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

2. प्रदूषण टाळा

हवेतील हानिकारक प्रदूषकांमुळे डोळे कोरडे पडू लागतात. त्यामुळे प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना चष्मा लावा.

3. धुम्रपानापासून दूर राहा

धुम्रपान किंवा सिगारेटच्या धुराच्या संपर्कात राहिल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे डोळ्यांची सतत जळजळ होणे, डोळे लाल होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com