जबरदस्त बॅटरी अन् 1TB स्टोरेजसह Realme GT 5Pro स्मार्टफोन होणार लाँच ; तपासा फिचर्स

Realme GT 5Pro : स्मार्टफोनमध्ये Realme ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवीन फोन लाँच करत असते. कंपनी लवकरच GT 5 Pro लाँच करणार आहे.
Realme GT 5Pro
Realme GT 5ProSaam Tv

Realme GT 5Pro Features And Specification:

स्मार्टफोनमध्ये Realme ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवीन फोन लाँच करत असते. कंपनी लवकरच GT 5 Pro लाँच करणार आहे. हा फोन ७ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे.

कंपनीने याआधी Realme GT 5 लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 देण्यात आला आहे. यानंतरच्या नवीन प्रो मॉडेलमध्ये अधिक चांगले फिचर्स देण्यात येणार आहे. या नवीन फोनच्या फिचर्सची माहिती समोर आली आहे.

कंपनीने आपल्या Weibo पोस्टमध्ये, Realme GT 5Pro मध्ये स्मार्टफोन लाँचची तारीख जाहीर केली आहे. हा फोन ७ डिसेंबरला ११.३० वाजता लाँच होणार आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर्स आहेत. यामध्ये OV648 पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर Realme GT 5Pro मध्ये मिळू शकतो.

एका रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असेल. यामध्ये 1TB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळेल. यामध्ये 6.78 इंचचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्यात 3,000 nits चा पीक ब्राइटनेस आणि BOE पॅनलचा सपोर्ट मिळेल.

Realme GT 5Pro
Chanakya Niti On Money : पैसे कमवताय? कसे खर्च कराल? तर नीतिशास्त्रातील श्लोकाचे अनुसरण करा

फोनमध्ये ट्रीपल रिअर कॅमेरा युनिट मिळू शकते. ज्यात तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि इलेक्ट्रॉनि इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह 50MP Sony IMX890 सेन्सर मिळेल. या फोनमध्ये 32 मेगापिक्सेल सेन्सर आहे. या फोनमध्ये 5,4000Ah बॅटरी आहे. यात 100W वायर्ड आणि 50W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

Realme GT 5Pro
Yoga For Immunity : वाढत्या प्रदूषणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही योगासने ठरतील फायदेशीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com