Relationship Tips Canva
लाईफस्टाईल

Relationship Tips: लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कसं जपाल जोडीदाराला? 'या' टीप्स करा फॉलो

Long Distance Relationship: लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवणे थोडे कठीण असते. पण तुम्ही तुमच्या नात्यामध्ये काही रोमांचक गोष्टी केल्यास तुमचे नाते आजून घट्ट होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tips for Long Distance Relationship:

एखाद्या नात्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विश्वास. प्रेमामध्ये विश्वास असल्यामुळे तुमचे नाते घट्ट होते. पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमुळे नात्यामध्ये बऱ्याचदा दुरावा निर्माण होतो. त्याची एनेक कारणे आहेत. नात्यामध्ये अनेकवेळा चढउतार पाहायला मिळतात, या समस्या व्यवस्थित हाताळल्या तर त्या सुटू शकतात. मात्र, तुम्ही या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे नाते तुटू शकते. जेव्हा लाँग डिस्टन्स रिलेशनशिपची चर्चा होते तेव्हा आपण अनेकवेळा ऐकतो की ते टिकणार नाही, किंवा त्यामुळे दुरावा निर्माण होतो. काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे लॉंग डिस्टेंस रिलेशनशिप अजून घट्ट होण्यास मदत होते.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कपल्स एकमेकांपासून शारीरिकदृष्ट्या लांब असतात. शारीरिकदृष्ट्या लांब राहिल्यामुळे एकमेकांबद्दलची काळजी कमी होते आणि एकमेकांसोबत वेळ घालवता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना ऑनलाईन वेळ देणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या नात्यामधील अनेक प्रश्न सुटतात त्यासोबतच नाते आझून घट्ट होण्यास मदत होते. जुन्या काळात कपल्स एकमेकांची चिठ्ठीच्या माध्यमातून विचारपूस करायचे. पण आता वाढत्या तंत्रण्यानामुळे एकमेकांपसून लांब असूनही मोबाईल फोनवर बोलू शकता आणि व्हिडिओकॉल करून एकमेकांना बघू शकता. जोडीदाराला नियमित वेळेवर व्हिडिओकॉल केल्याने तुम्हाला एकमेकांना वेळ देता येतो त्यासोबतच एकमेकांच्या जवळ आहात असे भासते.

तुमच्या जोडीदारासाठी स्वत:च्या हातानी बनवलेल भेटवस्तू द्या. यामुळे तुम्हाला त्याची किती आठवण येते हे तुम्ही त्यांना जाणिव करून देऊ शक्ता. त्यासोबतच ही भेटवस्तू तुमच्या जोडीदारासाठी खूप मोलाची असेल. तुम्ही त्यांना स्वता: बनवलेलं कार्ड पेंटिंग किंवा अतर कोण्तयाही गोष्टी देऊ शक्ता. हि भेटवस्तू तुमच्या जोडीदारासाठी प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतिक मानले जाईल. एकमेकांना दिवसभरात घडलेल्या गोष्टी सांगा त्यावर चर्चा करा. जर तुम्हाला काही टेंशन किंवा त्रास असेल तर तो एकमेकांसमोर व्याक्त करा.

असं म्हटलं जाते बोल्यावर प्रश्न सुटतात त्यामुले एकमेकांसाठी वेळ काढायला विसरु नका. दिवसभरातील तुमचे अनुभव सांगीतल्यावर एकनेकांच्या जिवनातील त्रास व्यता सोडबू शकता. आजच्या आधुनिक युगात, इंटरनेटच्या मदतीने त्वरीत संपर्क करता येतो. मोबाईलच्या मदतीने एकमेकांना व्हिडिओकॉल, व्हअर्चुअल मेसेज पाठवू शकता. यामुळे तुमच्या नात्यामध्ये आनंदाचं वातावरण राहिल. सोशल मिडियावर तुम्हाला अनेक ल्हव क्विट्स, मेसेजेसस, व्हिडिओज सापडतात ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला स्पेशल वाटू शकते. हे मेसेज एकमेकांसोबत शेअर करा. एकमोकांना वेळ दिल्यामुळे लांब राहूनही जवळ असण्याचा अनुभव मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT