Manasvi Choudhary
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे लाखो लोक दुबईमध्ये अडकले आहेत.
अशातच या गंभीर परिस्थितीत अनेकांना तेथून बाहेर पडणे कठीण झाले आहे. तर अनेकांनी आपले जीव देखील गमावला आहे.
अशातच , आता अभिनेता सोनू सूदने युद्धादरम्यान दुबईमध्ये अडकलेल्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
त्याने केवळ भारतीयच नाही तर मानवतेच्या आधारावर मी सर्वासाठी तत्पर राहील असं म्हटलं आहे.
अभिनेता सोनू सूद कायमच समाजसेवेसाठी मदत करताना दिसतो अशातच त्याने दुबईत अडकलेल्यांना मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.
या गंभीर परिस्थितीत तुम्ही जिकडे कुठे अडकले असाल तेथे मला कळवा, मी तुम्हाला मदत करेन अशी माहिती दिली आहे.