Data Leek: ऑनलाईन साथीदार शोधाताय? सावधान! 'डेटिंग ॲप्स'मधून वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता

Data Leek: तुम्ही डेटिंग अ‍ॅप्स वापरत असाल तर सावध होऊ जा. बहुतेक अ‍ॅप्स हे तुमचा ८० टक्के डेटा दुसऱ्याला विकत असतात.
Data Leek: ऑनलाईन साथीदार शोधाताय? सावधान!  'डेटिंग ॲप्स'मधून वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता

Dating Apps Leek Personal Data : डेटिंग अ‍ॅप्स वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही डेटिंग अ‍ॅप्स वापर करत असाल तर सावध व्हा! कारण या अ‍ॅप्समधून तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता एका अहवालातून वर्तवण्यात आलीय. डेटिंग ॲप्स तुमचा 80 टक्के वैयक्तिक डेटा जाहिरातीसाठी शेअर करू शकतात किंवा विकू शकतात, असा अहवाल प्रसिद्ध झालाय.

फायरफॉक्स इंटरनेट ब्राउझरच्या डेवलपर Mozilla ने २५ ॲप्सचे परीक्षण केलेत यातील २२ अ‍ॅप्समध्ये 'गोपनीयतेचा समावेश नाही' (Privacy Not Included) असे लेबल लावले, जे त्यांच्या भाषेनुसार सर्वात कमी रेटिंग असते. संशोधकाने समलिंगी मालकीच्या आणि ऑपरेट केलेल्या लेक्सला सकारात्मक अभिप्राय दिलाय. तर हार्मनी आणि हॅपनला साधरण रेटिंग दिलीय.

संशोधक मिशा रायकोव्ह म्हणाल्या, जितका जास्त वैयक्तिक डेटा शेअर करता तितका तुमचा जोडीदार मिळण्याची शक्यता जास्त असते, असं डेटिंग ॲप्स असा दावा करतात. पण "बहुतेक डेटिंग ॲप्स वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यास अपयशी ठरतात. अहवालानुसार, सुमारे २५ टक्के ॲप्स तुमच्या सामग्रीमधून मेटाडेटा गोळा करतात. फाईल्समध्ये फोटो (किंवा व्हिडिओ) केव्हा, कुठे आणि कोणत्या दिवशी काढला गेला याची माहिती असते.

याव्यतिरिक्त, या अहवालात दावा केला आहे की, बहुतेक डेटिंग ॲप्स, जसे की Hinge, Tinder, OKCupid, Match, Plenty of Fish, BLK आणि BlackPeopleMeet, त्यांच्या वापरकर्त्यांच्या अचूक भौगोलिक-स्थान (जियो- लोकेशन) ची माहिती असते. तर काही अ‍ॅप्स असे असतात की, ज्यांचा तुम्ही उपयोग जरी केला नाही. तरी ते अ‍ॅप्स तुमचे लोकेशनची माहिती घेत असतात. यामुळे या संशोधन करणाऱ्यांनी डेटिंग अ‍ॅप्स वापरणाऱ्यांना तीन सुचना दिल्यात. सर्व डेटिंग ॲप्ससाठी, तुमच्या डेटिंग प्रोफाइलला तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलप्रमाणे हाताळा,कोणत्याच थर्ड पार्टी अकाउंटवरून लॉग इन करू नका. शक्य असेल तेथे ॲप्सच्या परवानग्या मर्यादित ठेवा.

Data Leek: ऑनलाईन साथीदार शोधाताय? सावधान!  'डेटिंग ॲप्स'मधून वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता
Relationship: जोडीदार का फसवतात? 'या' 3 कारणांमुळे नात्यात निर्माण होतो दुरावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com