Relation Tips : सततच्या भांडणाने नात्यातला दुरावा वाढतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा

Healthy Relationships : अशावेळी वाद आणखी वाढतात. काही नात्यांमध्ये पती शांत स्वभावाचा असेल तर पत्नी रागीट स्वभावाची असते. त्यामुळे ते नात बालेंस करता येतं. मात्र दोघेही रागीट असतील तर ते नात तुटून जातं.
Healthy Relationships
Relation TipsSaam TV
Published On

Key For Healthy Relation :

प्रियकर - प्रेयसी असो अथवा पती - पत्नी या नात्यांमध्ये नेहमीच भांडणे होत असतात. मात्र ही भांडणे काही काळासाठी असतात. अनेकदा आपल्या आयुष्यातील जोडीदार सतत आपल्या मनाविरुद्ध वागतो अथवा आपल्या मनाचा विचार न करता निर्णय घेतो. अशावेळी वाद आणखी वाढतात. काही नात्यांमध्ये पती शांत स्वभावाचा असेल तर पत्नी रागीट स्वभावाची असते. त्यामुळे ते नातं बॅलेंस करता येतं. मात्र दोघेही रागीट असतील तर ते नातं तुटून जातं.

Healthy Relationships
Maldives India Relations : मालदीवच्या नवीन अध्यक्षांनी शपथ घेताच दाखवले रंग, भारतीय सैन्याला मायदेशी परतण्यास सांगितले

जेवण, फिरण्याच्या सवयी आणि स्वभाव या गोष्टींवर अनेक नात्यांमध्ये भांडणे होतात आणि दुरावा निर्माण होतो. बऱ्याचवेळी आपल्या पार्टनरला सुधारण्यासाठी संधी देऊन देखील त्याच्याकडून पुन्हा पुन्हा त्याच चुका होत असल्याचं दिसतं. पार्टनरचा एकमेकांवरील विश्वास कमी होतो. अनेकदा आपल्या आई वडिलांमुळे देखील नकळत आपण आपल्या जोडीदाराला दुखावतो. तुमच्या नात्यात देखील अशा गोष्टी होत असतील मात्र तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर या टीप्स फॉलो करा.

रागावर नियंत्रण

प्रत्येकवेळी विचार न पटल्यावर आपली भांडणे होतात. आपल्याला न पटणारे विचार आपल्यासमोर आले की सर्वात आधी आपल्याला राग येतो. राग अनावर झाल्याने आपण भांडतो. भांडताना मनातील सर्व गोष्टी व्यक्त करतो. याने नकळत आपण काय बोलत आहोत यावर आपलं स्वतःचं नियंत्रण राहत नाही. त्यामुळे आधी रागावर नियंत्रण मिळवा.

शांत रहा

एखादी गोष्ट अथवा विचार न पटल्यास त्यावर लगेचच निर्णय घेऊ नका. अथवा स्वत:चे मत सांगू नका. आपण असे बोलल्याने समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा आधी विचार करा. शक्यतो एखाद्या गोष्टीसाठी आपल्या पार्टनरने विरोध केला असेल तर त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करणे टाळा.

विश्वास

प्रत्येक नातं हे विश्वासावर टिकतं. प्रत्येकाला आपल्या पार्टनरवर विश्वास असणे गरजचे आहे. आपल्या पार्टनरकडून एखादी चूक झाल्यास मोठ्या मनाने त्याला माफ करा. ज्या गोष्टीवरून चूक झाली आहे त्यावरून आपल्या पर्टनवर पुन्हा कधीच संशय घेऊ नका. अनेकदा संशय आपलं नातं पूर्णतः संपवतो.

Healthy Relationships
Bhusawal Crime : बंदुकीचा धाक दाखवून बारा लाखांची रोकड लांबविली; जामनेर रस्त्यावरील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com