Parenting Tips Google
लाईफस्टाईल

Parenting Tips: फक्त खेळतंय, अभ्यासात लक्ष नाही; पालकांनी 'या' टिप्स फॉलो केल्यास बाळ होईल हुशार

Parenting Tips: आपलं बाळ हे अभ्यासात खूप हुशार असावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. लहान मुले खूप खेळकर असतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासात जास्त लक्ष लागत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालक नेहमी आपल्या मुलाच्या उज्जवल भविष्याचा विचार करत असतात. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे असं प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. परंतु अनेकदा मुलांचा स्वभाव खूप वेगळा असतो. अनेकदा मुलांचे एका विषयावर फार वेळ लक्ष लागत नाही. प्रत्येक काही मिनिटांनी त्यांना नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात. या परिस्थितीत मुलांचे अभ्यासात कमी खेळात जास्त लक्ष असते. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर वाईट परिणाम होतो.

आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलांना चांगले ज्ञान, शिक्षण आणि संस्कार देण्याचा प्रयत्न पालक करतात. मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा. मुलांना एकदम हसत-खेळत शिकवल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या मुलांना या पद्धतीने शिकवा त्यांना अभ्यासात नक्की फायदा होईल.

अभ्यासाची वेळ

मुलांसाठी अभ्यासाची वेळ निश्चित करा. त्यांना दिवसातून १-२ तास अभ्यास करायला लावा. जेणेकरुन त्यांचा अभ्यास होईल. त्याचसोबत एका जागेवर १-२ तास बसण्याची सवय होईल.

शांत वातावरण

लहान मुले खूप खेळकर असतात. त्यामुळे ते दिवसभर इकडे-तिकडे फिरत असतात. त्यामुळे अभ्यास करतामा तुम्ही नेहमी शांत वातावरण ठेवा. शांत वातावरणात त्यांचा अभ्यास चांगला होईल. जर तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलचा आवाज केला तर त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.

नवीन पद्धतीने मुलांना शिकवा

मुलांच्या शिकवणीच्या पद्धतीत बदल करा. मुलांना एखादा खेळ खेळायला शिकवा. त्या खेळाच्या माध्यमातून मुलांना नवनवीन गोष्टींची माहिती करुन द्या. यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढेल.

ब्रेक

अभ्यास करताना मुलांना १०- १५ मिनिटांचा ब्रेक द्या. १०-१५ मिनिटे जरा फिरुन आल्यावर मुलांन फ्रेश वाटेल. मुलं अजून उत्साहात अभ्यास करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

मराठमोळ्या अधिकाऱ्याचं 'पुढचं पाऊल'! IRTS अधिकारी सुशील गायकवाड महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तपदी, पदभार स्वीकारला

Ladki Bahin Yojana : 410 कोटींचा निधी मंजूर, 'लाडकी'ची दिवाळी गोड होणार? सप्टेंबरचा हप्ता मिळणार

SCROLL FOR NEXT