Beauty Tip: चेहऱ्यावर ग्लो हवाय? तो ही मेकअप न करता, मग या 3 टीप्स फॉलो करा

Skin Care Tips: प्रत्येक दिवशी आरोग्यासोबत चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. बदलत्या जीवनशैलीचा आपल्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.
Skin Care Tips
Beauty TipSaam Tv

सततच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या विश्वात रोज ऑफिस तसेच घर यांच्या कामातून आपल्याला स्वत:कडे देण्यासाठी पुरेसा वेळही नसतो. यासर्वांमुळे झटपट अशा ब्युटी टीप्सने मेकअप न करता देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सहज ग्लो आणू शकता. मात्र तो कसा ग्लो आणता येईल त्यासाठी खालील टीप्स फॉलो करा.

Skin Care Tips
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

महिलांच्या शरीरामध्ये नेहमी हार्मोनस चेंजेस होत असतात तसेच या धावपळीच्या जगात आपले खाण्याच्या सवयीमध्ये बदल झालेला आहे ज्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो. काही काळानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात,आपण जर वेळेत आपल्या चेहऱ्याची नीट काळजी घेतली नाही तर, आपला चेहरा काळवंडू शकतो आणि चेहऱ्यावर पिंपल्स (Pimple )तसेच डार्क स्पोर्टसारख्या समस्या उद्धभवतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याची तसेच शरीराची योग्य काळजी वेळेवर घेणे आवश्यक असते,त्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत नेमकं काय करायचं हे जाणून घेऊयात.

१. नारळ पाणी

नारळ पाणी हे प्रत्येर व्यक्तीच्या शरीरासाठी खूप फायदेमंद असते. परंतू याची कल्पना अनेकाना नसते मात्र याच नारळ(coconut) पाणीमुळे आपली स्कीन देखील फ्रेश आणि ताजीतवाणी राहते. नारळ पाण्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि डेडस्कीन निघण्यास मदत होते.सर्वात आधी नारळ पाणी घेऊन त्यात एक चमचा मध मिस्क करावे नंतर आइस ट्रेमध्ये पाणी टाकून आइस क्युब होईपर्यंत ते ठेवून द्यावे. आइस क्युब तयार झाल्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावर हलक्या पद्धतीने मसाज करु घ्या,असे केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि डेडस्कीनही निघण्यास मदत होते.

२. हळद आणि दुधावरील मलई

नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी हळद फायदेशीर ठरते .त्यामुळे एक चमचा हळद आणि त्यामध्ये एक चमचा दुधावरील शाई घेऊन दोन्हींची पेस्ट करावी. दररोज ही पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावावी त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावा, असे तुम्ही आठवडाभर केल्यास तुमचा चेहरा अधिकच चमकदार दिसू लागेल आणि चेहऱ्यावरील सुरुकत्याही निघण्यास मदत होईल.

३. बटाटा

स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारा बटाटाही चेहरा चमकदार होण्यासाठी फायदेशीर ठरतो. बटाट्याचा रस काढून डोळ्याखालील आलेल्या डार्क स्पॉर्टवर लावल्यास काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होत. मात्र आठवडाभर हा उपाय केल्यास तुम्हाला त्याचा अनुभव दिसून येईल.

डिक्लेमर: सदर लेख माहितीसाठी असून अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Skin Care Tips
Money Saving Tips | Lifestyle मध्ये करा हे बदल, पैशांची होईल बचत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com