Skin Care Tips: चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि पिंपल्स दूर करण्यासाठी तुळस ठरेल रामबाण उपाय; अशी पद्धतीने करा वापर

Skin Care Tips: उन्हाळ्यात आरोग्यासोबत चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर खूप तेलकटपणा येतो. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, सन टॅनिंग, ब्लॅक हेड्स येतात.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv
Published On

उन्हाळ्यात आरोग्यासोबत चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर खूप तेलकटपणा येतो. तसेच उन्हाळ्यात गर्मी आणि बाहेरील धूळीचे कण यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते. चेहऱ्यावर पिंपल्स, सन टॅनिंग, ब्लॅक हेड्स येतात. यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. त्याचसोबत त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतः ला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी दिवसभरात खूप पाणी प्यावे. उन्हाळ्यात पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीचा वापर करु शकता.

लालसरपणा

तुळशीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील छिद्र खोलवर स्वच्छ करतात. त्यातील घाण काढून टाकतात. त्यामुळे पिंपल्स येत नाही. तसेच चेहरादेखील स्वच्छ होतो. यासाठी तुम्ही तुम्ही तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या. रोज चेहरा धुतल्यानंतर हे पाणी तोंडावर मारा. यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होईल.

पिंपल्सवर रामबाण उपाय

उन्हाळ्यात चेहऱ्यावर धूळ बसल्याने पिंपल्स येतात. या पिंपल्सवर तुळशीची पाणे उपयुक्त ठरु शकतात. यासाठी तुम्हाला तुळशीची पाने बारीक करुन घ्यायची. त्यात चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी टाकावे. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील. तसेच तेलकट त्वचेपासूनदेखील सुटका मिळेल.

Skin Care Tips
International Brothers Day: यंदाच्या बदर्स डेनिमित्त भावाला द्या हे गिफ्ट; भाऊ होईल खूश

ब्लॅकहेड्स नाहीसे होतील

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुळस फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला तुळस, कडुलिंबाची पाने आणि मध एकत्रितपणे मिसळून चेहऱ्याला लावा. यानंतर चेहरा १० मिनिटांनी धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.

Skin Care Tips
Vegetable Price Increases: सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली, पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com