ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपला चेहरा नेहमी सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटते. परंतु धूळ, तेलकटपणा यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.
पिंपल्समुळे चेहरा खराब दिसतो. पिंपल्स घालवण्यासाठी तुम्ही घरबसल्या फेसपॅक बनवू शकतात.
पिंपल्ससाठी तुम्ही मुलतानी मातीचा फेसपॅक बनवू शकतात मुलतानी मातीतील गुणधर्मांमुळे चेहरा थंड राहतो.
मुलतानी मातीचा फेसपॅक १०- १५ मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावा. मुलतानी माती सुकल्यावर स्वच्छ तोंड धुवावे.
तु्म्ही चेहऱ्याला कडुलिंबाचा रस लावू शकतात. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो.
तुम्ही मुलतानी माती आणि चंदन पावडर याचा एकत्र फेसपॅक बनवू शकतात. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
तुम्ही चेहऱ्यावर गुलाबपाणी आणि लिंबाचा रस लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतात.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.