Bharat Jadhav
नारळ हे हिंदू धर्मात खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात.
नारळ किंवा श्रीफळ बाबत अशीही एक मान्यता आहे की, एकदा भगवान विष्णू लक्ष्मी मातासोबत पृथ्वीवर आले होते. तेव्हा लक्ष्मी मातेने कामधेनू गाय आणि नारळाचे झाडही पृथ्वीवर आणले होते.
कोणतेही शुभ कार्य, नवीन घर, दुकान किंवा नवीन वाहन घेतल्यास नारळ फोडण्याची परंपरा आहे.
कारण नारळ हे माणसासारखे मानले जाते. नारळ मानवी कवटीसारखे वाटतं. नारळावरील भाग हा मानवी केसांसारखा असतो. यामुळे प्राणी किंवा मानवाचा बळी देण्याऐवजी नारळाचा वापर केला जाऊ लागला.
घरामध्ये नारळाचे पाणी शिंपडल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होते.
हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो.
मान्यतेनुसार, लोक नारळावर बनवलेले तीन डोळ्यांचा भाग हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतित मानलं जातं.म
नारळावर दिसणारे तीन गोल डोळे हे भगवान शंकराच्या त्रिनेत्राचे रूपही मानले जातात.
येथे क्लिक करा