Bharat Jadhav
वास्तूशास्त्रानुसार रात्री झाडू मारल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. झाडूची अनेकजण पुजा करतात. झाडूमध्ये लक्ष्मी मातेचा वास असल्याचं म्हटलं जातं. रात्री झाडू मारल्याने लक्ष्मी माता नाराज होत असते.
रात्रीच्या वेळी घरातील कचरा बाहेर कचरा टाकू नये. कारण असे मानले जाते की देवी-देवता रात्री झोपतात आणि यावेळी कचरा बाहेर टाकल्याने त्यांना त्रास होत असतो.
रात्रीच्या वेळी नखे कापणेही टाळावेत. रात्री नखे कापल्याने आर्थिक हानी होत असते.
रात्री केस कापल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात. रात्री केस कापल्याने ग्रहांची स्थिती नकारात्मक होते, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये. रात्री कपडे धुतल्याने लक्ष्मी माता कोप असते, त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण होत असते.
रात्री पैसे उधार देणे किंवा पैसे घेणे हे देखील अशुभ मानले जाते. रात्री उधार पैसे दिल्यास धनहानी होऊ शकते, असे मानले जाते.
रात्रीच्यावेळी हळद, तेल, दूध-दही इत्यादी वस्तू उसाणे देऊ नये किंवा त्याचे दान करू नये.
येथे क्लिक करा