Panchgani SAAM TV
लाईफस्टाईल

Panchgani : पावसात 'पाचगणी'चे मनमोहक सौंदर्य अनुभवा, 'या' थंडगार ठिकाणांना भेट द्या..

Panchgani Travel Places In Monsoon : पावसात करा 'पाचगणी'ची सफर, पाचगणी येथील पर्यटन स्थळे जाणून घेऊयात..

Shreya Maskar

आता सर्वत्र पावसाची हिरवळ आणि ओलेचिंब रस्ते पाहायला मिळत आहे. या थंडगार वातावरणात बाहेरच्या निसर्गाचा अनुभव घेणे म्हणजे एक प्रकारचा स्वर्गच होय. पावसाला सुरुवात होताच आपले बाहेर फिरण्याचे प्लॉन सुरु होतात. नेहमी तिच पावसाळी ठिकाणे फिरून तुम्हालाही आता कंटाळा आला असेल तर मग या सुट्टीत तुम्ही महाराष्ट्रातील एक अद्भुत सौंदर्य अनुभवा. आपल्या मित्रपरिवारासोबत पाचगणी शहराला भेट द्या.

पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागार निसर्गाचा अनुभव येथे घेता येतो. हायकिंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग करण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पाचगणीला वास्तुकला आणि इतिहासाचे आकर्षण आहे. पाचगणीतील 'या' निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या.

धोम धरण

धोम धरण हे जल क्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. हे धरण शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून बांधण्यात आले.

लिंगमाळा धबधबा

लिंगमाळा धबधब्याला पावसात आवर्जून भेट द्या आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य अनुभवा. लिंगमाळा धबभबा पर्यटकांचे आकर्षण आहे. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. फोटोशूटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

कास पठार

कास पठार फुलांची व्हॅली म्हणून ओळखले जाते. कास पठार हे फुलांचे आकर्षण आहे. ट्रेकिंगसाठी देखील हे उत्तम स्थळ आहे.

देवराई कला गाव

देवराई कला गाव हे कलाप्रेमींसाठी फिरण्याचे उत्तम ठिकाण आहे. हस्तकलेचे सुंदर नमुने येथे पाहायला मिळतात.

कमलगड किल्ला

कमलगड किल्ला खडकांनी वेढलेला आहे. इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक कमलगड किल्ल्याला आवर्जून भेट देतात.

राजपुरी लेणी

राजपुरी लेणी हे पाचगणी मधील एक पवित्र स्थळ आहे. पावसात या लेणीला भेट देणे उत्तम राहील.

विल्सन पॉइंट

विल्सन पॉइंटला सनराईज पॉइंट असेही म्हणतात. सूर्यास्ताचा अद्भुत अनुभव येथे पाहायला मिळतो. फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

प्रतापगड किल्ला

हिरव्यागार झाडांनी वेढलेला हा किल्ला पर्यटनाचे आकर्षण आहे. येथे शिवकालीन इतिहास अनुभवायला मिळतो. पाचगणीला आल्यावर लोक येथे आवर्जून भेट देतात.

सिडनी पॉइंट

सिडनी पॉइंट या टेकडीवरून कृष्णा खोरे, कृष्णा नदी, कमलगड किल्ला आणि वाई शहराचे सौंदर्य अनुभवता येते.

पारसी पॉइंट

पारसी पॉइंट हे मित्रपरिवारासोबत जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पाचगणीचे सौंदर्य येथून टिपता येते. तसेच हे फोटोशूटसाठी देखील उत्तम ठिकाण आहे.

पाचगणीला कधी जायचे?

पावसाळा हा ऋतू पाचगणीला भेट देण्यासाठी उत्तम आहे. या काळात तुम्हाला हिरव्यागार निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT