Bajrang Punia: ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेल्या बजरंग पुनियाला मिळाली आनंदाची बातमी; क्रीडा मंत्रालय करणार आर्थिक मदत

Bajrang Punia: पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतरही क्रीडा मंत्रालय भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला आर्थिक मदत करणार आहे. बजरंग पुनियाला ६५ किलो फ्रीस्टाइल वजनी गटात रोहित कुमारने पराभूत केले होते.
 Bajrang Punia:
Bajrang Punia:business standard

Provide Financial Help Wrestler Bajrang Punia :

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या शर्यतीतून बाहेर पडलाय. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंगला पराभवाचा सामना करावा लागला होता. टोकियो ऑलिम्पिक (२०२०) कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला ६५ किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या उपांत्य फेरीत कुस्तीपटू रोहित कुमारने पराभूत केले होते.(Latest News)

पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही क्रीडा मंत्रालय बजरंग पुनियाला आर्थिक मदत करणार आहे. क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी (२६ मार्च) बजरंग पुनियाची आर्थिक मदत देण्याची विनंती मंजूर केलीय. याशिवाय त्यांचे 'कंडिशनिंग कोच' काझी किरण मुस्तफा हसन यांचा कार्यकाळ मे अखेरपर्यंत वाढवण्यात आलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याविषयीचे माहिती क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिलीय.'मिशन ऑलिम्पिक सेलने (MOC) कुस्तीपटू बजरंग पुनियाला आर्थिक सहाय्य देण्याच्या आणि त्याचे कंडिशनिंग प्रशिक्षक काझी किरण मुस्तफा हसन यांचा कार्यकाळ मे अखेरपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. मात्र क्रीडा मंत्रालयाने किती रक्कम मंजूर केली आहे, याचा खुलासा केलेला नाही.

बजरंग पुनिया व्यतिरिक्त क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिला ऑलिम्पिकपूर्वी चायनीज तैपेईमध्ये सराव करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची विनंती देखील मंजूर करण्यात आलीय. मिशन ऑलिम्पिक सेलने टेबल टेनिसपटू मानव ठक्कर आणि पायस जैन यांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या प्रस्तावांनाही मान्यता दिलीय.

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात विरोध करणाऱ्या आणि आंदोलान करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया यांचा समावेश होता. बजरंग पुनियाने नुकतेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ला पत्र लिहून WFI विरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र काही दिवसांनंतर UWW ने WFI वरील बंदी उठवण्यात आली.

 Bajrang Punia:
IPL 2024: एक नंबर! 'रॉकेट मॅन बनत धोनीने घेतला गजब कॅच; चपळता पाहून प्रेक्षक अवाक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com