PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

PM Kisan 22nd installment payment: पीएम किसान योजनेचा २२ वा हफ्ता उद्या येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट २००० रुपये जमा होणार आहेत. पण काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामागचे कारण घ्या जाणून...
PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

Summary -

  • पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता उद्या येणार

  • शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये कधी जमा होणार

  • पीएम किसान योजनेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत

  • ई-केवायसी न केल्यास पीएम किसान हप्ता थांबणार

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात १३ मार्चला म्हणजे उद्या २००० रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता कधी येणार याची वाट देशभरातील लाखो शेतकरी पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा उद्या संपणार आहे. त्यांच्या खात्यात खटाखट २००० रुपये जमा होतील.

सरकारने स्पष्टपणे सांगितले की, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या पैशांतून शेतीच्या किरकोळ खर्चात त्यांना हातभार लागतो. अनेक दिवसांपासून या योजनेच्या २२ व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत. हे पैसे उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही.

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?
PM Kisan Yojana: खुशखबर! १३ मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

यावेळी सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांना हप्त्याचे पैसे मिळण्यास वेळ लागू शकतो. सरकारने यापूर्वीच सांगितले आहे की, योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?
PM Kisan Yojana: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा हप्ता; २ दिवसात खात्यात जमा होणार ₹२०००

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार नाहीत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचे शेतकरी असल्याचे ओळखपत्र तयार झालेले नाही, ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती चुकीची दिली आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार आणि बँक खाते लिंक झाले नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा २२ वा हप्ता मिळणार नाही.

अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास विलंब होतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही कामं पूर्ण केली नाहीत त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com