White Clothes Cleaning Tips : पावसात पांढरे कपडे धुणे झाले कठीण? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स..

White Clothes Cleaning Tips For Monsoon : पावसात कपड्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यात जर कपडे पांढऱ्या रंगाचे असतील तर त्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
White Clothes Cleaning Tips For Monsoon
White Clothes Cleaning TipsSAAM TV

पांढरा रंग अनेकांना खूप आवडतो. या रंगासोबत आपण अनेक प्रकारचे कपडे स्टाईल करू शकतो. पावसात मात्र हे सफेद रंगाचे कपडे घालण्याआधी अनेक वेळा विचार करावा लागतो. कारण पांढऱ्या कपड्यांवर लगेच डाग पडतात. पण अनेकांना पावसात सफेद कपडे घालण्याचा मोह आवरत नाही आणि ते छान पावसात पांढरे कपडे स्टाईल करतात. पांढरे कपडे घालून त्यांची हौस तर पूर्ण होते पण नंतर मात्र मळलेले सफेद कपडे धुवायला त्यांना कठीण जाते. त्यामुळे बहुतेक लोक पावसात सफेद कपडे घालणे टाळतात. पण आता तुम्ही सफेद कपड्यांच्या स्वच्छतेची चिंता सोडून पावसात सुद्धा बिनधास्त पांढरे कपडे घालून शकता. आता सफेद कपड्यांच्या स्वच्छतेसाठी 'या' टिप्स फॉलो करा.

पावसात पांढरे कपडे कसे धुवावे?

पावसात पांढरे कपडे नेहमी वेगळे धुवावे. कपडे स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे कपड्यांवरील घाणीचे डाग लवकर निघून जाण्यास मदत होते. तसेच डाग काढताना कपड्यांवर जोरात ब्रश फिरवू नये. त्यामुळे कपड्यांचे धागे निघतात आणि कपडा आतून नाजूक होतो. तसेच कपडे धुवून झाल्यावर ते वॉशिंग मशीनच्या साहाय्याने छान कोरडे करावे आणि पंख्याखाली वाळवावे. पावसात कपडे बाहेर वाळवू नये. पावसातील ओलाव्यामुळे कपडे दमट हेतात आणि त्यांना वासही येऊ लागतो.

लिंबाचा रस

पावसातील चिखलामुळे सफेद कपडे खराब होतात. त्यामुळे कपडे धुतांना गरम पाण्यात लिंबाचा रस टाकावा. असे केल्यास कपड्यांवरील डाग लवकर निघून जातात.

ब्लीचिंग पावडर

पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी ब्लीचिंग पावडर हा उत्तम पर्याय आहे. पाण्यात ब्लीचिंग पावडर टाकून काही वेळ कपडे पाण्यात भिजवून ठेवा. कालांतराने कपडे गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

White Clothes Cleaning Tips For Monsoon
Swimming: स्विमिंग करताना तुमच्याही कानात पाणी जातं? मग वेळीच उपचार घ्या, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

व्हाईट व्हिनेगर

पाण्यात थोडा लिंबाचा रस घालून त्यामध्ये १-२ चमचे व्हाईट व्हिनेगर घाला. व्हिनेगरच्या पाण्यात १५-२० मिनिटे कपडे भिजवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा टाकून त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. तयार झालेली पेस्ट पांढऱ्या कपड्यांवरील डागांवर १५ ते २० मिनिटे ठेवा. थोड्या वेळाने कपडे गरम पाण्याने धुवावे.

टूथपेस्ट

पांढऱ्या कपड्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी तुम्ही रोजच्या वापरातील टूथपेस्टचा देखील वापर करू शकता. कपड्यावरील डागावर टूथपेस्ट लावून ब्रशने डाग साफ करावा. त्यानंतर वॉशिंग पावडरच्या साहाय्याने कपडे स्वच्छ करावे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

White Clothes Cleaning Tips For Monsoon
Eye Health Tips : एका आठवड्यात चष्म्याचा नंबर कमी होईल; जेवणात वापरा 'हे' रामबाण तेल, नजर होईल तीक्ष्ण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com